पुणे: शहराच्या पूर्व-उत्तर उपनगरांमध्ये लोकसंख्येचा झपाट्याने विस्तार होत असताना, नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या आरोग्य यंत्रणेचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पुणे विमानतळ परिसरातील लोहगाव येथे ससून रुग्णालयाच्या धर्तीवर तब्बल ५५ कोटी रुपये खर्च करून १०० खाटांचे भव्य असे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात आले आहे. सुमारे सहा एकरांच्या प्रशस्त परिसरात ही देखणी इमारत उभी राहिली असली, तरी अपुरी यंत्रसामग्री, रिक्त पदांची मोठी पोकळी आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे या रुग्णालयाचा सर्वसामान्यांना हवा तसा फायदा मिळत नसल्याचे चित्र समोर आले आहे.
सध्या या रुग्णालयामध्ये दररोज सुमारे २०० रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) प्राथमिक तपासणी होत आहे; परंतु गंभीर आजार, अपघात किंवा फ्रॅक्चर झालेल्या रुग्णांना येथे योग्य उपचार मिळत नसल्याने त्यांना आजही १८ किलोमीटर दूर असलेल्या ससून सर्वोपचार रुग्णालयात जाण्यासाठी 'रेफर टू ससून' असा सल्ला दिला जात आहे. यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
वाढती लोकसंख्या आणि हक्काच्या रुग्णालयाची गरज: लोहगाव आणि आसपासच्या परिसरातील लोकसंख्या आता झपाट्याने वाढून १ लाख ३२ हजारांहून अधिक झाली आहे. या वाढत्या लोकसंख्येला डोळ्यासमोर ठेवून लोहगाव येथे १०० खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. परंतु, इमारत पूर्ण तयार होऊनही नागरिकांना अद्याप पूर्ण क्षमतेने याचा लाभ मिळत नाही. रुग्णालयात एक्स-रे, सीटी स्कॅन, एमआरआय आणि सोनोग्राफी यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि मूलभूत तपासणी सुविधांची वानवा आहे. त्यामुळे साध्या फ्रॅक्चर किंवा गंभीर दुखापतीनंतर उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना नाइलाजाने खासगी रुग्णालयांचा किंवा ससूनचा रस्ता धरावा लागत आहे.
रुग्णालयातील पदभरती आणि रिक्त पदांचे वास्तव: लोहगाव उपजिल्हा रुग्णालयातील पदभरतीचे आणि रिक्त पदांचे वास्तव देखील अत्यंत चिंताजनक आहे:
-
एकूण मंजूर पदे: ९४
-
नियमित पदे: ३६
-
रिक्त पदे: १८
-
बाह्य यंत्रणेमार्फत भरण्यास मंजूर पदे: ५८
-
रिक्त पदे: १४
याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देशमाने यांनी सांगितले की, हे रुग्णालय सध्या तात्पुरत्या स्वरूपात (ड्राय रन) सुरू करण्यात आले असून हे रुग्णालय रुग्णांच्या सेवेत कार्यान्वित होण्यास सज्ज असल्याचे पत्र शासनाला देण्यात आले आहे; मात्र हे अधिकृतपणे पूर्ण क्षमतेने कधी सुरू होईल, याबाबत कोणतीही निश्चित माहिती सध्या उपलब्ध नाही.
स्थानिक नागरिकांची नाराजी: स्थानिक रहिवासी आणि रुग्णांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की, बांधकामाच्या ठिकाणी काम करताना किंवा इतर अपघातांत जखमी झालेल्यांना प्राथमिक उपचार किंवा टी.टी.चे इंजेक्शन मिळतात, परंतु एक्स-रे मशीन किंवा इतर यंत्रणा बंद वा अनुपलब्ध असल्यामुळे रुग्णांना दुसरीकडे धाव घ्यावी लागते. आपल्याच परिसरात एवढी मोठी वास्तू उभी राहूनही जर गरिबांना फिरून ससूनलाच जावे लागणार असेल, तर या कोट्यवधींच्या खर्चाचा उपयोग काय? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
शहर
- मुंबई: सीएसएमटी रेल्वे स्थानकावर बुकिंग हॉलजवळ छताचा भाग कोसळला; दुर्घटनेत दोन प्रवासी जखमी, सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू
- मुंबई: विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांवरही डिजिटल वॉच राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठी 'स्वित्चॅट' ॲपद्वारे ऑनलाईन उपस्थिती अनिवार्य
- मुंबई: मनोज जरांगे पाटलांच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, सखोल चौकशीची मागणी
- मुंबई: उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश: राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक आणि चेतावणी फलक बंधनकारक करण्याचे आदेश
महाराष्ट्र
- मुंबई: सीएसएमटी रेल्वे स्थानकावर बुकिंग हॉलजवळ छताचा भाग कोसळला; दुर्घटनेत दोन प्रवासी जखमी, सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू
- मुंबई: विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांवरही डिजिटल वॉच राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठी 'स्वित्चॅट' ॲपद्वारे ऑनलाईन उपस्थिती अनिवार्य
- नाशिक: साक्षी चांडक देशात पहिली सीए इंटरमीडिएट परीक्षेत ५०२ गुणांसह ऑल इंडिया रँक १ मिळवत घडवला ऐतिहासिक इतिहास
- रत्नागिरी: जिल्ह्याला दुष्काळाचा भीषण फटका १२ हजार ८५० हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त, ४३ हजारांहून अधिक शेतकरी संकटात
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार
- नवी दिल्ली: परिसीमन विधेयकासाठी भाजपची मोठी चाल इंडिया आघाडीतील सर्वात मोठ्या पक्षाला सोबत घेण्याची तयारी
- नवी दिल्ली: ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागत नाही, तुम्ही आता परदेशात आहात... केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राहुल गांधींवर जोरदार टीका!



























Subscribe to my channel




