नवी दिल्ली: संसदेत आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए (NDA) सरकारला सातत्याने साथ देणारे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व YSRCP पक्षाचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांच्या राजकीय भूमिकेत मोठा आणि नाट्यमय बदल पाहायला मिळत आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीबाबतच्या कायद्याला आणि निवडीच्या प्रक्रियेला मान्यता देण्याच्या आपल्या जुन्या निर्णयावर जगन मोहन रेड्डी यांनी जाहीरपणे दुःख व पश्चात्ताप व्यक्त केला आहे. याशिवाय त्यांनी कॉकरोच जनता पार्टीला (CJP) तसेच डाव्या पक्षांना या मुद्द्यावर समर्थन देण्याचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, जगन मोहन रेड्डी म्हणाले, “आता आम्हाला या गोष्टीचे खूप दुःख होतेय आणि जाणीव होतेय की त्या निवडीच्या प्रक्रियेला सहमती देणे आमची मोठी चूक होती.” सध्याच्या नियमांनुसार निवडणूक आयुक्तांची नेमणूक तीन सदस्यीय समितीद्वारे केली जाते. या समितीमध्ये देशाचे पंतप्रधान, त्यांनी नामांकित केलेला एक केंद्रीय मंत्री आणि विरोधी पक्षनेते यांचा समावेश असतो. या रचनेमुळे सत्ताधारी पक्षाचे वर्चस्व राहते, असा आरोप करत जगन मोहन रेड्डी यांनी या कायद्यात तात्काळ सुधारणा करण्याची आणि निवड समितीत भारताच्या सरन्यायाधीशांचा (CJI) पुन्हा समावेश करण्याची आग्रही मागणी केली आहे.
YSRCP च्या या बदललेल्या भूमिकेमागे काय कारणे आहेत? YSRCP पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले की, त्यांनी नेहमीच मुद्यांवर आधारित एनडीए सरकारला पाठिंबा दिला होता. परंतु, निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेबाबत आणि निष्पक्षतेबाबत जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. यापूर्वी २०२० मधील कृषी कायदे, २०२३ मधील नवीन संसद भवनाचे उद्घाटन (ज्यावर संपूर्ण विरोधकांनी बहिष्कार टाकला होता), नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA), कलम ३७० हटवणे, तसेच २०२५ मधील उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत YSRCP ने थेट मोदी सरकारला पाठिंबा दिला होता.
मात्र, नुकत्याच झालेल्या आंध्र प्रदेश विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत YSRCP ला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. सध्या तेथील टीडीपी-भाजपा-जनसेना आघाडी सरकारकडून आपल्या नेत्यांना, जसे की लोकसभेतील गटनेते पी. व्ही. मिधून रेड्डी यांना त्रास दिला जात असल्याचा आणि सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आरोप वाईएसआरसीपीने केला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जगन मोहन रेड्डी आता केंद्र सरकारविरोधात विरोधी पक्षांची वज्रमूठ बांधण्याच्या तयारीत असून डाव्या पक्षांशी व इतर विरोधी गटांशी संवाद साधत आहेत.
शहर
- नाशिक: सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी भीषण अपघात भरधाव कारने पोलीस व भाविकांना उडवले, वाहतूक उपनिरीक्षक जागीच ठार तर अनेकजण जखमी!
- मुंबई: मनोरी क्षारनिरास प्रकल्पाविरोधातील मच्छिमारांचा मोर्चा पोलिसांनी रोखला: बसेस अडवून चालकांना घेतले ताब्यात, चाव्याही केल्या जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण; हल्लेखोरांनी झाडल्या ५ गोळ्या अन् झाले पसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये २ संशयित निष्पन्न!
- मुंबई: प्रताप सरनाईक पूर्णेकर कुटुंबाच्या भेटीला! घटनास्थळावरूनच एकनाथ शिंदेंना लावला फोन; मुख्य सूत्रधारांना कडक शिक्षेचे आश्वासन!
महाराष्ट्र
- कोल्हापुर: दानोळीत भरदिवसा सराईत गुन्हेगारावर गोलिबार करत निर्घृण खून, शिरोळ तालुका हादरला!
- बुलढाणा: माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या अडचणीत मोठी वाढ शैक्षणिक संस्थांच्या चौकशीसाठी पोलिसांची नोटीस, १९९३ पासूनची मागवली माहिती!
- नाशिक: सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी भीषण अपघात भरधाव कारने पोलीस व भाविकांना उडवले, वाहतूक उपनिरीक्षक जागीच ठार तर अनेकजण जखमी!
- मुंबई: आयआयटी मुंबई साहिल मृत्यू प्रकरण आई-वडिलांसह आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, संचालकांच्या निवासस्थानाबाहेर विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!



























Subscribe to my channel



