मुंबई: प्रताप सरनाईक पूर्णेकर कुटुंबाच्या भेटीला! घटनास्थळावरूनच एकनाथ शिंदेंना लावला फोन; मुख्य सूत्रधारांना कडक शिक्षेचे आश्वासन!

Pratap Sarnaik has been appointed as the new chairman of MSRTC. I want to  strengthen ST bus Maharashtra's true people's transport both financially  and in terms of service quality, said Pratap Sarnaik,मुंबई: ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्येनंतर राजकीय वर्तुळात मोठे वादळ उठले आहे. या घटनेनंतर शिंदे शिवसेनेच्या वतीने प्रथमच राज्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी पूर्णेकर कुटुंबाच्या घरी जाऊन त्यांची सांत्वन भेट घेतली. या भेटीदरम्यान सरनाईक यांनी पूर्णेकर कुटुंबीयांचे सांत्वन करत या हत्याकांडातील दोषी आणि मुख्य सूत्रधार कोणीही असो, त्यांना कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळवून दिली जाईल, असे ठाम आश्वासन दिले.

यावेळी मंत्री सरनाईक यांनी थेट घटनास्थळावरूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावून प्रदीप पूर्णेकर यांचे बंधू राम पूर्णेकर यांच्याशी संवाद घडवून आणला.

पूर्णेकर कुटुंबाची आक्रमक मागणी आणि सरनाईकांचे स्पष्टीकरण

भेटीदरम्यान प्रदीप पूर्णेकर यांच्या पत्नीने अत्यंत भावुक आणि आक्रमक होत मागणी केली की, या हत्येमागे असणाऱ्या मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक करण्यात यावी आणि संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची निष्पक्ष चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी.

यावर बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, "उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूर्णेकर कुटुंबाच्या दुःखात पूर्णपणे सहभागी आहेत. या प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप केला जाणार नाही. पोलिसांकडून अत्यंत निष्पक्षपणे तपास सुरू असून माजी महापौरांचीही चौकशी करण्यात आली आहे. या घटनेचा कोणीही राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करू नये. पूर्णेकर यांच्या मारेकऱ्यांना भरचौकात फाशीची शिक्षा झाली पाहिजे हीच आमची भूमिका आहे."

राजकारणाचे आरोप अन् पोलिसांचा तपास

ठाण्यात झालेल्या या हत्येनंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याचा शब्द दिला होता. त्यानंतर आता शिंदे सेनेच्या मंत्र्याने भेट दिल्यामुळे या प्रकरणातील राजकीय वातावरण तापले आहे.

सरनाईक यांनी स्पष्ट केले की, घटनेनंतर गैरसमज पसरवले जात असल्यामुळे ते सुरुवातीला तिथे गेले नव्हते, मात्र पोलिसांना तपासात पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. या प्रकरणात ठाणे पोलीस ठाण्याकडून सखोल तपास सुरू असून लवकरच सर्व सूत्रधार गजाआड होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *