नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीतील विविध व्यापारी संघटनांनी चालू असलेल्या राजकीय आंदोलनांवर आणि मोर्च्यांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. 'चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री' (CTI) या प्रमुख व्यापारी संघटनेने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एक पत्र लिहून, आगामी दिवाळीचा सण संपईपर्यंत दिल्लीतील सर्व प्रकारच्या आंदोलनांवर, धरणे-प्रदर्शनांवर आणि राजकीय मोर्चांवर तातडीने बंदी घालण्याची जोरदार मागणी केली आहे.
गेल्या काही दिवसांत झालेल्या तीव्र निदर्शनांमुळे दिल्लीतील प्रमुख बाजारपेठांना तब्बल २,००० कोटी रुपयांपेक्षा अधिकचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले असल्याचा दावा सीटीआईने (CTI) केला आहे.
१० ऑक्टोबरच्या आंदोलनामुळे बाजारपेठांमध्ये लॉकडाउनसारखी स्थिती
व्यापारी संघटनेच्या म्हणण्यानुसार, १० ऑक्टोबर रोजी झालेल्या एका मोठ्या आंदोलनामुळे दिल्लीतील कनॉट प्लेस (Connaught Place), खान मार्केट आणि इतर व्यापारी केंद्रांमध्ये लॉकडाउनसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. या आंदोलनांमुळे बाजारपेठांमध्ये ग्राहकांची ये-जा पूर्णपणे मंदावली आणि वाहतूक विस्कळीत झाली. परिणामी, केवळ एकाच दिवसाच्या अशांततेमुळे दिल्लीतील व्यापाऱ्यांना आणि दुकानदारांना सुमारे २,००० कोटी रुपयांच्या व्यापाराचे मोठे नुकसान सहन करावे लागले.
'सणासुदीच्या काळातच वर्षाची सर्वाधिक कमाई'
सीटीआईचे म्हणणे आहे की, शारदीय नवरात्रोत्सवापासून ते दिवाळी आणि भाऊबीजेपर्यंतचा काळ हा भारतातील व्यापाऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा आणि उत्पन्नाचा काळ असतो. वर्षभरातील जवळपास ५० टक्क्यांहून अधिक उलाढाल याच सणासुदीच्या काळात होत असते. कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, दागिने, सजावटीचे साहित्य आणि मिठाई विक्रेते या दिवसांची वर्षभर वाट पाहत असतात. मात्र, ऐन फेस्टिव्ह सीझनमध्ये होणाऱ्या अशा आंदोलनांमुळे ग्राहक बाजारात येण्यापासून परावृत्त होत आहेत, ज्यामुळे सुमारे २० लाख लहान-मोठे व्यापारी आणि त्यांचे कुटुंबीय चिंतेत सापडले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे हस्तक्षेप करण्याची मागणी
दिल्लीतील कायदा व सुव्यवस्था राखत असतानाच व्यापाऱ्यांच्या आर्थिक हितांचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद करत, सीटीआईने गृहमंत्री अमित शाह यांना विनंती केली आहे की, जोपर्यंत दिवाळीचा सण संपत नाही, तोपर्यंत राष्ट्रीय राजधानीत कोणत्याही मोठ्या राजकीय आंदोलनाला किंवा मोर्चाला परवानगी देऊ नये. यामुळे बाजारात शांतता आणि सुव्यवस्था कायम राहील आणि ग्राहक कोणतीही भीती न बाळगता खरेदीसाठी मोकळ्या मनाने बाजारात येऊ शकतील.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
- महाराष्ट्र: शरद पवार गटाला खिंडार! तीन आजी-माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!
- नवी दिल्ली: "मी सर्वोच्च न्यायालयाची दहादा माफी मागतो..."सरन्यायाधीशांच्या टिप्पणीनंतर खासदार संजय राऊतांनी मागितली माफी!



























Subscribe to my channel




