मुंबईतील सीए आत्महत्या प्रकरण: "बाळासाठी प्रियकरासोबत संबंध ठेवणार अन् तुझे तुकडे निळ्या ड्रममध्ये भरेन!" पत्नीच्या अजब आणि संतापजनक अटीमुळे खळबळ

मुंबई: मुंबईतून एक अत्यंत संतापजनक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत एका ३९ वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट (CA) तरुणाने लोकल ट्रेनसमोर उडी मारून आपले जीवन संपवले होते. पतीच्या या टोकाच्या पावलामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. मात्र, जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास केला, तेव्हा जे सत्य समोर आले त्याने पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली. पत्नीचे तिच्या प्रियकरासोबत असलेल्या अनैतिक संबंधांमुळे आणि मानसिक छळाला कंटाळून या तरुण सीएने आत्महत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृताची पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणातील नवनवीन खुलासे अंगावर काटा आणणारे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, मृत सीए आणि त्याच्या पत्नीच्या संसारात गेल्या काही काळापासून मोठे वाद सुरू होते. पत्नीचे एका अन्य व्यक्तीसोबत अनैतिक संबंध सुरू होते. विशेष म्हणजे, हद तर तब झाली जेव्हा पत्नीने पतीसमोर एक अत्यंत विचित्र आणि संतापजनक मागणी ठेवली. आपल्याला मूल हवे असून त्यासाठी आपण आपल्या प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवणार आहे, असा उघड दावा तिने केला होता. या अजब हट्टाला पतीने तीव्र विरोध केला असता, पत्नीने त्याला प्रचंड मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.

तसेच, विरोध केला तर अत्यंत निर्घृणपणे संपवण्याची धमकीही ती देत असे. "तुझे शरीराचे तुकडे करून निळ्या रंगाच्या ड्रममध्ये भरून फेकून देईन," अशा अत्यंत भयानक शब्दांत ती आपल्या पतीला धमकावत असे. या सततच्या मानसिक त्रासामुळे, धमक्यांमुळे आणि पत्नीच्या अनैतिक कृत्यामुळे तीव्र नैराश्यात गेलेल्या त्या सीए तरुणाने अखेर नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलले आणि आयुष्य संपवले. या खळबजनक प्रकरणामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक कसून तपास करत आहेत.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *