बीड: तालुक्यातील पाली येथील ऐतिहासिक नागनाथ मंदिर परिसरात रविवारी (११ ऑक्टोबर) दुपारी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे माजी सहकारी अमोल खुणे यांच्यावर ५० ते १०० जणांच्या टोळक्याने लाठ्या-काठ्यांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात अमोल खुणे आणि त्यांचे चुलत भाऊ गंभीर जखमी झाले असून खुणे हे घटनास्थळीच बेशुद्ध पडले होते. त्यांना उपचारासाठी तातडीने बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, "मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलल्यामुळेच त्यांच्या सांगण्यावरून हा हल्ला करण्यात आला आणि नारायणगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्यास मला जाता येऊ नये यासाठी ही सुपारी देऊन हल्ला घडवून आणला," असा खळबळजनक आरोप अमोल खुणे यांनी रुग्णालयातून केला आहे.
मंदिराचा दरवाजा आतून बंद करून बेदम मारहाण: मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, अमोल खुणे हे तुळजापूरहून आपल्या गावी ज्योत घेऊन येत असताना बीड जवळील पाली येथील श्री नागनाथ मंदिरात दर्शनासाठी थांबले होते. ते मंदिरात गेले असताना १५ ते २० जणांचे टोळके अचानक तिथे आले. हळूहळू तेथे ५० ते १०० जणांचा जमाव गोळा झाला. हल्लेखोरांनी मंदिराचा दरवाजा आतून बंद करून घेतला आणि "तू मनोज जरांगे यांच्या विरोधात का बोलतोस?" असा जाब विचारत लाकडी दांडके, काठ्या आणि लाथाबुक्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.
या हल्ल्यात अमोल खुणे यांच्या दोन्ही हातांना, पाठीवर आणि डोक्याला गंभीर दुखापती झाल्या आहेत. मारहाण इतकी भीषण होती की ते मंदिरातच बेशुद्ध होऊन पडले. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या त्यांच्या भावालाही जमावाने मारहाण केली.
जरांगे यांच्यावर गंभीर आरोप आणि राजकीय वातावरण तापले: अमोल खुणे हे पूर्वी मनोज जरांगे पाटील यांचे खंदे समर्थक आणि सहकारी म्हणून ओळखले जात होते. मात्र, काही महिन्यांपासून त्यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या आर्थिक कारभारावर, निधीवर आणि कार्यपद्धतीवर जाहीर टीका करण्यास सुरुवात केली होती.
उपचारादरम्यान बोलताना खुणे यांनी सांगितले, "आगामी नारायणगडावरील दसरा मेळाव्यात मी जरांगेंच्या विरोधात मोठा खुलासा करणार होतो. मला या मेळाव्याला जाता येऊ नये आणि माझा आवाज दाबता यावा, यासाठीच मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांनी कट रचून हा हल्ला घडवून आणला आहे."
पोलीस तपास आणि परिसरात तणाव: घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी आणि जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. पोलीस या घटनेचा गांभीर्याने तपास करत असून, मंदिराच्या परिसरातील सीसीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे बीड जिल्हा आणि मराठवाड्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहर
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
- नवी दिल्ली: आता संपूर्ण देशच जंतर मंतर बनेल!" आंदोलनाच्या यादीतून नाव हटवताच कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दीपके यांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- पुणे: अखेर यश! शासनाने मागण्या मान्य केल्यामुळे एमपीएससी विद्यार्थ्यांचे १२ दिवसांचे आंदोलन स्थगित; उच्चस्तरीय समितीची स्थापना!
महाराष्ट्र
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
- अमरावती: फिल्मी थरार! टोलनाका तोडत चालत्या कारमधून उडी मारून पळणाऱ्या सराईत लुटारूला पोलिसांनी घेतले जेरबंद
- नवी दिल्ली: आता संपूर्ण देशच जंतर मंतर बनेल!" आंदोलनाच्या यादीतून नाव हटवताच कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दीपके यांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!























Subscribe to my channel



