पुणे: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला असताना, आमदार रोहित पवार यांनी नानांशी झालेल्या अखेरच्या संभाषणाची भावूक आठवण सांगितली आहे. नाना पाटेकर येत्या दोन ते तीन दिवसांत पुण्यात येणार होते आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला प्रत्यक्ष भेट देऊन पाठिंबा देणार होते, असा मोठा खुलासा रोहित पवार यांनी केला. नानांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर आज दुपारचे आपले सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम स्थगित करत असल्याचेही रोहित पवारांनी जाहीर केले.
"विद्यार्थ्यांचे आंदोलन महत्त्वाचे, यश नाही आले तर मी स्वतः येईन"
रोहित पवारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, काही दिवसांपूर्वी एका मित्राच्या माध्यमातून त्यांचा नाना पाटेकर यांच्याशी फोनवर संपर्क झाला होता. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि पुण्यातील आंदोलनाबाबत त्यांच्यात चर्चा झाली होती. या संभाषणाची आठवण सांगताना रोहित पवार म्हणाले, "एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन अत्यंत महत्त्वाचे आहे. मला या आंदोलनात नक्की सहभागी व्हायचे आहे. मी सध्या बाहेर आहे, पण येत्या दोन-तीन दिवसांत प्रश्न सुटला नाही आणि हे आंदोलन पुढील चार दिवस चालले, तर मी स्वतः पुण्यात येऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेईन आणि त्यांच्या पाठीशी उभा राहीन, असा शब्द नानांनी दिला होता."
मात्र, पुण्यात येऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला.
"रोखठोक स्वभाव आणि दादांशी खास नातं"
नाना पाटेकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे स्मरण करताना रोहित पवार म्हणाले की, नाना हे अतिशय रोखठोक आणि स्पष्टवक्ते माणूस होते. अजितदादांसारखाच थेट बोलण्याचा आणि निर्णय घेण्याचा त्यांचा स्वभाव होता. "मराठी कलावंत असूनही त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत आपले नाव अत्यंत आदराने कोरले. शेतकऱ्यांसाठी तर त्यांनी अफाट कार्य उभे केले. अजितदादांच्या निधनानंतर मुंबईत झालेल्या शोकसभेत नाना पाटेकर इतके भावुक झाले होते की, त्या दुःखात त्यांना दादांविषयी शब्दही उच्चारता आले नव्हते," अशी आठवण सांगत रोहित पवारांनी नानांना श्रद्धांजली वाहिली.
शहर
- मुंबई: फक्त दक्षिण मुंबई स्वच्छ दिसली म्हणजे संपूर्ण शहर स्वच्छ नाही; कचरा आणि अस्वच्छतेच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाचे बीएमसीला खडेबोल!
- नवी मुंबई: कांद्याने आणले डोळ्यात पाणी; घटलेले उत्पादन आणि माथाडी कामगारांच्या निर्णयाचा फटका, किरकोळ बाजारात दर ८० रुपयांवर!
- मुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बनावट तिकिटांचा गोरखधंदा उघड; एकाला अटक, मुख्य सूत्रधाराचा कसून शोध सुरू!
- मुंबई: बेस्ट'मध्ये कंडक्टर होण्यासाठी उमेदवारांना विचारले भन्नाट आणि अजब प्रश्न; परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे!
महाराष्ट्र
- मुंबई: फक्त दक्षिण मुंबई स्वच्छ दिसली म्हणजे संपूर्ण शहर स्वच्छ नाही; कचरा आणि अस्वच्छतेच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाचे बीएमसीला खडेबोल!
- कोल्हापूर: आधी प्रति टन ५०० रुपये अनुदान द्या, तरच कारखाने सुरू करू देऊ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींचा सरकारला स्पष्ट इशारा!
- कोल्हापूर: शारदीय नवरात्रोत्सव २०२६ करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या गाभाऱ्याची स्वच्छता अन् दागिन्यांना व पूजेच्या साहित्याला सुवर्ण-चांदीची झळाळी!
- महाराष्ट्र: बळीराज्यासाठी नेहमी झटणारे नाना पाटेकर! दुष्काळाच्या परिस्थितीवर दोन दिवसांपूर्वीच नानांनी काय म्हटलं होतं? 'नाम' फाऊंडेशनचे सीईओ गणेश थोरात यांनी सांगितली आठवण!
गुन्हा
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: विरोधकांची मोट बांधण्यासाठी रणनीती; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंकडून आज 'इंडिया' आघाडीच्या खासदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण!
- सोलापूर: राहुल-प्रियांका यांच्या अटकेच्या निषेधार्थ सोलापुरात काँग्रेसची आक्रमक निदर्शने; कार्यकर्ते आणि पोलिसांत जोरदार झटापट, कपडेही फाटले!
- दिल्ली: 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनादरम्यान आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश; राहुल आणि प्रियंका गांधींव्यतिरिक्त इतर नेत्यांवर गुन्हा दाखल!
- बेंगळुरु: हिंदी शिकत नसाल तर नोकरी सोडून निघून जा; बंगळुरुच्या वेअरहाऊसमध्ये भाषिक वाद विकोपाला, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल अन् मोठा संताप
























Subscribe to my channel




