मुंबईकरांच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा! बदलत्या हवामानामुळे घसा खवखवणे आणि खोकल्याच्या रुग्णांत मोठी वाढ

मुंबई: बदलते हवामान, दिवसाणारा प्रचंड उकाडा आणि वाढते वायुप्रदूषण यांचा तीव्र परिणाम आता थेट मुंबईकरांच्या आरोग्यावर होताना स्पष्टपणे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात नागरिकांमध्ये घशातील खवखव, कोरडेपणा, जळजळ, सतत कोरडा खोकला आणि आवाज बसण्याच्या तक्रारींमध्ये कमालीची वाढ झाली आहे. मुंबईतील खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये श्वसनमार्गाशी संबंधित विविध त्रास घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे वैद्यकीय वर्गाकडून सांगण्यात येत आहे.

विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आधीपासूनच ॲलर्जीचा किंवा दम्याचा त्रास असलेल्या व्यक्तींनी या काळात अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. मुंबईत सध्या ऋतुबदलाचा काळ सुरू असून तापमान आणि हवेतील आर्द्रतेमध्ये सतत चढ-उतार होत आहेत. या हवामान बदलांमुळे मानवी श्वसनमार्गाच्या संवेदनशीलतेवर प्रतिकूल परिणाम होतो. घशात कोरडेपणा जाणवणे, खाजवल्यासारखी खवखव होणे आणि बोलताना किंवा गिळताना त्रास जाणवणे, ही या आजाराची सुरुवातीची लक्षणे आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, काहींना सर्दी किंवा ताप नसतानाही तीव्र आणि सतत खोकला येत असल्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

प्रदूषणातील सूक्ष्म कण ठरताहेत त्रासदायक: वातावरणातील बदलांसोबतच मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणाचाही थेट श्वसनसंस्थेवर घातक परिणाम होत आहे. रस्त्यांवरील प्रचंड धूळ, वाहनांमधून मोठ्या प्रमाणावर बाहेर पडणारा धूर आणि विविध भागांत सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणांहून हवेत पसरणारे अतिसूक्ष्म कण यांमुळे घसा आणि श्वसनमार्गाला मोठा त्रास होऊ शकतो. प्रदूषित हवेमुळे आधीपासूनच ॲलर्जी, दमा किंवा इतर श्वसनविकार असलेल्या रुग्णांचा त्रास कैक पटीने वाढण्याची शक्यता असते. काही वेळा घशातील सततची जळजळ आणि खोकल्याच्या तीव्र त्रासामुळे रुग्णांची रात्रीची झोपही विस्कळीत होत आहे. मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या आणि व्यस्त शहरात वाहतुकीची वर्दळ आणि बांधकामांमुळे धुळीचा संपर्क टाळणे अनेकांसाठी अशक्य ठरत आहे. त्यामुळे घराबाहेर काम करणाऱ्या व्यक्तींनी तसेच लहान मुलांना शाळेत सोडण्यासाठी किंवा इतर कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे.

घशाची काळजी कशी घ्याल? तज्ज्ञांचा सल्ला: घशातील खवखव आणि कोरडेपणा कमी करण्यासाठी दिवसभर पुरेसे पाणी पिणे, कोमट पाण्याच्या गुळण्या करणे आणि धुळीच्या किंवा प्रदूषणाच्या ठिकाणी आवर्जून मास्कचा वापर करणे अत्यंत उपयुक्त ठरू शकते. थंडपेये आणि आइस्क्रीम यांच्या सेवनामुळे त्रास अधिक वाढण्याची शक्यता असल्याने त्यांचे सेवन तात्पुरते टाळावे. वातानुकूलित यंत्रणेचा (AC) अतिवापर करणे टाळावे. घरातील हवा स्वच्छ ठेवणे, धूळ साचू न देणे आणि सकस व संतुलित आहार घेणे आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

या संदर्भात बोलताना लीलावती रुग्णालयाच्या श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. जलील पारकर यांनी सांगितले की, "हे वातावरण बदलाचा आणि हवेची गुणवत्ता घसरल्याचा थेट परिणाम आहे. सध्या ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांपैकी अनेकांना ताप, तीव्र खोकला आणि श्वास घेण्यास त्रास जाणवत आहे. धुळीचे बारीक कण श्वासावाटे शरीरात प्रवेश करतात, ज्यामुळे अनेकदा कोरडा खोकला उद्भवतो आणि घसा लाल होतो." जे. जे. रुग्णालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. मधुकर गायकवाड यांनीही दुजोरा दिला आहे की, या काळात नागरिकांनी आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास अशा प्रकारच्या श्वसनाच्या समस्येपासून सहज बचाव करता येऊ शकतो. खोकला दीर्घकाळ टिकून राहिल्यास किंवा श्वास घेण्यास अडचण व छातीत दुखू लागल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

1 thought on “मुंबईकरांच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा! बदलत्या हवामानामुळे घसा खवखवणे आणि खोकल्याच्या रुग्णांत मोठी वाढ”

  1. I believe evverything postted made a bunch of sense. But, think abouit this, what iff you typd a catchier title?

    I mean, I don’t wiush to tell you how to run your website, hoever suppose you added
    a tktle that grabbed folk’s attention? I mean Respiratory Alerrt in Mumbai: Sore Thrats andd Cough Cases
    Surge Amid Pollutio and Changing Weather – Pune Newss 24 is kinda
    vanilla. Yoou ould glahce at Yahoo’s home page aand see how thesy create nedws
    titles to geet people tto click. You might addd a video or a
    pucture or two tto rab peope exhited aboht everything’ve
    written. In my opinion, it mifht bring your websikte a little
    bbit more interesting. xnxx

    Feel freee tto surf tto my site :: site

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *