भंडारा: जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या दुष्काळी पाहणी दौऱ्यात, मंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून आपल्या शेतीची आणि संकटांची व्यथा मांडणाऱ्या एका शेतकऱ्याने अखेर टोकाचे पाऊल उचलले आहे. मोहाडी तालुक्यातील धोप येथील या शेतकऱ्याने गुरुवारी (८ ऑक्टोबर) सकाळी गावातीलच विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. राजेंद्र अमर सपाटे (वय ४५ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण भंडारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून शेतकरी वर्गात तीव्र संताप व शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना काय घडली? काही दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यात भीषण दुष्काळ आणि अनियमित पावसामुळे झालेल्या धान पिकांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मोहाडी तालुक्यातील धोप, हिवरा, जाम व कांद्री आदी गावांचा दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान धोप येथील शेतकरी राजेंद्र अमर सपाटे यांनी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्यासमोर प्रत्यक्ष जात आपल्या डोळ्यात पाणी आणून शेतीपिकांच्या नुकसानीची आणि कुटुंबावर आलेल्या आर्थिक संकटाची कैफियत मांडली होती. मात्र, अस्मानी संकटाने व कर्जबाजारीपणाने घेरलेल्या राजेंद्र सपाटे यांना या त्रासातून कोणताही दिलासा मिळाला नाही, असे दिसून आले. गुरुवारी (८ ऑक्टोबर) सकाळी त्यांनी टोकाचे पाऊल उचलत गावातील विहिरीत उडी घेतली.
गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप आणि हळहळ: राजेंद्र सपाटे यांनी विहिरीत उडी घेतल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला आहे आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया: शेतकऱ्याच्या या आत्महत्येचे वृत्त बाहेर येताच संपूर्ण जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. गावामध्ये सध्या संतापाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या दुर्दैवी घटनेवर प्रतिक्रिया देताना माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, "शेतकऱ्यांच्या दुःखाची आणि व्यथांची किंमत त्यांच्या मृत्यूनंतर सरकार मोजणार असेल, तर हे अत्यंत वेदनादायी आणि दुर्दैवी आहे." प्रशासनाचे दुर्लक्ष आणि अस्मानी संकटामुळे बळीराजा एकामागून एक टोकाची पावले उचलत असल्याने नागरिकांमधून तीव्र रोष व्यक्त होत आहे.
शहर
- मुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बनावट तिकिटांचा गोरखधंदा उघड; एकाला अटक, मुख्य सूत्रधाराचा कसून शोध सुरू!
- मुंबई: बेस्ट'मध्ये कंडक्टर होण्यासाठी उमेदवारांना विचारले भन्नाट आणि अजब प्रश्न; परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे!
- पुणे: पिंपळे गुरवमधील ७ मजली अनधिकृत इमारतीवर चालवला हातोडा, प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांचे कडाडून सवाल
- पुणेः पोलीस दलात मोठी खळबळ! औंध परिसरातील राहत्या घरी पोलीस उपनिरीक्षकाने डोक्यात गोळी झाडून संपवले जीवन
महाराष्ट्र
- नवी मुंबई: कांद्याने आणले डोळ्यात पाणी; घटलेले उत्पादन आणि माथाडी कामगारांच्या निर्णयाचा फटका, किरकोळ बाजारात दर ८० रुपयांवर!
- मुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बनावट तिकिटांचा गोरखधंदा उघड; एकाला अटक, मुख्य सूत्रधाराचा कसून शोध सुरू!
- मुंबई: बेस्ट'मध्ये कंडक्टर होण्यासाठी उमेदवारांना विचारले भन्नाट आणि अजब प्रश्न; परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे!
- महाराष्ट्र: एक असामान्य पर्व संपलं..; ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भावूक श्रद्धांजली!
गुन्हा
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- सोलापूर: राहुल-प्रियांका यांच्या अटकेच्या निषेधार्थ सोलापुरात काँग्रेसची आक्रमक निदर्शने; कार्यकर्ते आणि पोलिसांत जोरदार झटापट, कपडेही फाटले!
- दिल्ली: 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनादरम्यान आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश; राहुल आणि प्रियंका गांधींव्यतिरिक्त इतर नेत्यांवर गुन्हा दाखल!
- बेंगळुरु: हिंदी शिकत नसाल तर नोकरी सोडून निघून जा; बंगळुरुच्या वेअरहाऊसमध्ये भाषिक वाद विकोपाला, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल अन् मोठा संताप
- नवी दिल्ली: मोठ्या बंदोबस्तात महिलांशी गैरव्यवहार ; दिल्लीतील 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप





















Subscribe to my channel




