
Pune ATS Raid : राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडून पुण्यातील कोंढवा परिसरात आणि मोमीनपुरा परिसरात छापा टाकण्यात आला. पुण्यातून तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथकाने पहाटेपासून 44 विविध ठिकाणी छापेमारी केली. ईसीस दहशतवादी संघटनेशी संबधित तब्बल 15 दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ठाणे जिल्ह्यातील पडघा, बोरीवली शहापूर, मिरा रोड, भिवंडी, कल्याण या ठिकाणी एनआयए आणि एटीएसची पहाटेपासून छापेमारी सुरु आहे.
44 ठिकाणी करण्यात आलेल्या छापेमारीत हसीब मुल्ला, मुसाफ मुल्ला, रेहन सुसे, फरहान सुसे, फिरोज कुवारी, आदिल खोत, मुखलीस नाचन , सैफ आतिक नाचन, याह्या खोत, राफील नाचन, राजील नाचन, शदुब दिवकर, कासिम बेलोरे, मुंजीर केपी या दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या पकडलेल्या दहशतवाद्यांकडून मोबाईल फोन , धारदार शस्त्र, तलवारी आक्षेपार्य साहित्य, पॅलेस्टाईनचा झेंडा, हार्ड डीस्क जप्त करणयात आले आहे.
|
|
18 जुलैला पुण्यातील कोथरूड परिसरात पुणे पोलिसांनी मध्यरात्री पेट्रोलिंग करत असताना मध्यरात्री इमरान खान आणि मोहम्मद साकी या दोन दहशतवाद्यांना पकडलं होतं. त्यावेळी त्यांचा तिसरा साथीदार पोलिसांना चकवा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला होता. त्यानंतर झालेल्या पोलीस तपासात दहशतवाद्यांची पुढची लिंक उघडकीस आली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात यापूर्वी काही दहशतवादी सापडले होते. त्यांच्याकडे बॉम्ब बनवण्याचं साहित्य सापडलं होतं. शिवाय त्यांनी जिल्ह्यातील काही जंगलात जावून बॉम्ब टेस्टिंग केल्याचंदेखील समोर आलं होतं.
यापूर्वी पुण्यात NIA आणि ATS च्या छापेमारीत पकडण्यात आलेले सगळे दहशतवादी हे पुण्यातील कोंढवा परिसरात राहत असल्याचं समोर आलं होतं. या दहशतवाद्यांना पुण्यातील कोंढवा परिसरातूनच वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतलं होतं. या कोंढव्यात दहशतवाद्यांनी त्यांचा अड्डा बनवल्याचंदेखील समोर आलं होतं. ते राहत असलेल्या ठिकाणी बॉम्ब बनवण्याचं साहित्य सापडलं होतं शिवाय बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया लिहिलेला कागददेखील सापडला होता.
दहशतवादी कारवाया करण्याचा रचला होता कट
आरोपींनी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तेलंगणा आणि इतरांसह अनेक राज्यांमध्ये दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचला असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान त्यांच्या या कारवायांमुळे अनेक विघातक कृत्ये होण्याची शक्यता होती. तसेच एनआयएने केलेल्या तपासात आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि सध्या सुरू असलेल्या प्रकरणात आयएसआयएस हँडलर्सचा सहभाग असल्याचं उघड करण्यात आलं आहे. भारतामध्ये ISIS च्या अतिरेकी विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी एक मोठे नेटवर्क देखील या तपासात उघड झालं आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




