NCP Merger | राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सुनील तटकरे यांनाही पूर्वकल्पना होती? खळबळजनक दावा समोर!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाच्या चर्चेसंदर्भात गेल्या काही महिन्यांपासून बैठकींचा सिलसिला सुरू होता. सूत्रांच्या माहितीनुसार, नोव्हेंबरपासून राज्यातील काही महत्त्वाच्या नेत्यांसोबत या बैठकींना सुरुवात झाली होती. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत अजित पवार यांनी घेतलेल्या 10 ते 12 बैठकींमध्ये पक्षाच्या रणनीतीवर चर्चा झाली. या बैठकींमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पूर्वकल्पना होती, असे सूत्रांनी सांगितले. 16 जानेवारीला सुनील तटकरे यांनी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. ही बैठक अजित पवार यांच्या मुंबईतील प्रेमकोर्ट निवासस्थानी झाली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, याच बैठकीत अजित पवार यांनी तटकरेंना विलीनीकरणाची कल्पना मांडली होती आणि तटकरे सुद्धा या प्रस्तावास सकारात्मक होते. या बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या शक्यता आणि भविष्यातील राजकीय समीकरणांवर चर्चा सुरु असल्याची माहिती मिळत आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *