पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवरील व्हीटीपी टाऊन स्क्वेअरजवळ शुक्रवारी (दि. २) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कर्नाटकहून माल घेऊन आलेला १६ टायरचा आरएमसी ट्रक रस्त्याच्या मध्यभागातील दुभाजकावर चढून पलटी झाला. चालकाला डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अपघातस्थळी रस्त्याच्या एका बाजूला मोठा खड्डा असून, मध्यभागातील दुभाजक तुटलेल्या अवस्थेत आहे. विशेष म्हणजे, रात्री तसेच पहाटेच्या कमी प्रकाशात वाहनचालकांना दुभाजक स्पष्टपणे दिसावा, यासाठी पुरेसे रिफ्लेक्टिव्ह मार्किंग, रंगकाम किंवा सुरक्षा चिन्हे नसल्याचे दिसून येते. येथील एका बाजूला खड्डा, दुसऱ्या बाजूला तुटलेला दुभाजक आणि त्यावर रात्री दिसतील अशी प्रभावी मार्किंग नाही.
यामुळे मार्गावर अवजड वाहनांसह दुचाकी, कार तसेच स्कूल बसमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. साहजिकच या अपघातामुळे म्हाळुंगे-नांदे मार्गावरील रस्त्याची दुरवस्था आणि अपुऱ्या सुरक्षा उपायांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
रस्त्यांच्या दुरवस्थेवर आणि सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह: या अपघातामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. हा अपघात केवळ चालकाच्या चुकीमुळेच नव्हे, तर संबंधित प्रशासनाच्या अनास्थेमुळे आणि रस्त्यांच्या अत्यंत वाईट स्थितीमुळे झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. घटनास्थळाची पाहणी केली असता, म्हाळुंगे-नांदे रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे आणि जीवघेणे खड्डे पडल्याचे दिसून आले आहे. याशिवाय, रस्त्याच्या दुभाजकांची (Medians) दुरवस्था झाली असून ते पूर्णपणे तुटले आहेत. रात्रीच्या वेळी किंवा धुक्याच्या वातावरणात वाहन चालवताना सुरक्षिततेसाठी आवश्यक असणारे कोणतेही 'रिफ्लेक्टीव्ह मार्किंग्ज' (Reflective Markings) किंवा दिशादर्शक फलक या रस्त्यावर उपलब्ध नाहीत. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे या मार्गावरून प्रवास करणे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहे.
स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाकडे तातडीने रस्ते दुरुस्तीची आणि जड वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे. तसेच या मार्गावर रात्रीच्या वेळी होणाऱ्या वाहतुकीवर पोलिसांची कडक गस्त असावी, जेणेकरून अशा अपघातांना आळा घालता येईल, अशी आक्रमक भूमिका नागरिकांनी घेतली आहे. प्रशासनाने वेळीच योग्य पावले न उचलल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
शहर
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- मुंबई: 'कॉक्रोच जनता पार्टी' आणि अभिजित दिपकेंवर नितेश राणे यांचे गंभीर आरोप; छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याचा दावा करत 'तुकडे-तुकडे गँग'शी जोडले कनेक्शन
- मुंबई: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश! महाराष्ट्र शासनाकडून MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या बदलीचे आदेश जारी
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
महाराष्ट्र
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- महाराष्ट्र: धावणाऱ्या परराज्यातील गाड्यांवर आरटीओचा मोठा बडगा; ५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार
- सातारा: यशवंतराव चव्हाण स्मृती परिसरात खाद्यपदार्थांवर बंदी! कराड नगरपालिकेचे मोठे पावले उचलत नियमावली केली लागू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?

























Subscribe to my channel




