मुंबई: ठाण्यातील प्रस्तावित ॲमेझॉन एआय डेटा सेंटरसह रिंग मेट्रो आणि पॉड ट्रान्सपोर्ट प्रकल्पांच्या पर्यावरणीय व नागरी परिणामांचा फेरविचार करण्याची आक्रमक मागणी उद्धवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिकृत पत्र पाठवून या प्रकल्पांबाबत स्वतंत्र पर्यावरणीय व पायाभूत सुविधांचा आढावा घेण्याची तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या सहभागातून पूर्णपणे पारदर्शक प्रक्रिया राबविण्याची आग्रही मागणी केली आहे.
ठाणे शहराच्या पर्यावरणीय संतुलन, नागरी रचना आणि स्थानिक पायाभूत सुविधांवर दीर्घकालीन व दूरगामी परिणाम करणारे अनेक प्रकल्प सध्या प्रस्तावित आहेत. त्यामुळे या प्रकल्पांची निविदा प्रक्रिया किंवा पुढील कामे घाईघाईने पुढे नेण्यापूर्वी त्यांचे सर्वंकष व सखोल मूल्यमापन होणे अत्यंत आवश्यक असल्याचे आदित्य ठाकरे यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे.
डेटा सेंटरवर नेमके आक्षेप काय? ठाण्यातील बाळकूम येथे प्रस्तावित करण्यात आलेल्या ॲमेझॉन एआय डेटा सेंटरमुळे शहराच्या पाणीपुरवठा, वीज जोडण्या, रस्ते वाहतूक, ध्वनी प्रदूषण, वाढणारी उष्णता, पर्यावरण आणि थेट सार्वजनिक आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य दुष्परिणामांचा स्वतंत्रपणे अभ्यास करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ठाणे शहरावर यापूर्वीच पिण्याच्या पाण्याचा, वाहतूक कोंडीचा आणि इतर पायाभूत सुविधांचा कमालीचा ताण आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या मोठ्या डेटा सेंटरसाठी ज्याठिकाणी पर्यावरणीय व पायाभूत सुविधा अधिक सक्षम असतील, अशा एखाद्या योग्य पर्यायी ठिकाणाचा गांभीर्याने विचार करावा, असे ठाकरे यांनी सुचवले आहे.
सुमारे ५ हजार झाडांवर आणि पर्यावरणावर संकट? प्रस्तावित रिंग मेट्रो आणि पॉड ट्रान्सपोर्ट प्रकल्पांच्या मार्गात येणारी सुमारे पाच हजार झाडे, महत्त्वाचे कांदळवन (मॅग्रोव्ह्ज) आणि एकूणच परिसंस्थेवर होणाऱ्या संभाव्य परिणामांची स्वतंत्र व निष्पक्ष तपासणी करण्याची मागणीही या पत्रात करण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आमचा कोणताही विरोध नाही, मात्र पर्यावरणाची अपरिमित हानी टाळून अधिक परिणामकारक आणि शाश्वत वाहतूक नियोजन करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.
याशिवाय, आधीच रेंगाळलेले मेट्रो-४ आणि मेट्रो-५ हे महत्त्वाचे प्रकल्प प्राधान्याने वेळेत पूर्ण करून सध्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम केली पाहिजे. त्यानंतरच अतिरिक्त वाहतूक प्रकल्पांची नेमकी गरज किती आहे आणि त्याचे पर्यावरणीय परिणाम काय असतील, याचा फेरविचार करावा, अशी स्पष्ट राजकीय व नागरी भूमिका आदित्य ठाकरे यांनी मांडली आहे.
नागरिकांची मते आणि हरकती जाणून घेण्याची मागणी या सर्व महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत स्थानिक नागरिकांच्या हरकती, सूचना आणि मते जाणून घेण्यासाठी पूर्णपणे पारदर्शक सार्वजनिक सुनावणी किंवा प्रक्रिया राबवावी, जेणेकरून ठाणेकरांच्या हिताचे रक्षण होईल, अशी मागणीही पत्राच्या शेवटी करण्यात आली आहे.
शहर
- पुणे: नवले पुलाखाली वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली; पोलिसांसमोरच झेब्रा क्रॉसिंगचे उल्लंघन सुरू
- पुणेः आंबेगाव बुद्रुक परिसरात वर्गमित्रांकडून १५ वर्षीय शाळकरी मुलावर तीक्ष्ण शस्त्राने जीवघेणा हल्ला; दोन अल्पवयीन ताब्यात!
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
महाराष्ट्र
- अंबरनाथ: पालिकेची सभा सुरू असताना नाट्यगृहाबाहेर कारमध्ये सापडली तलवार व शस्त्रे; दोघांना ताब्यात घेतल्याने मोठी खळबळ
- मुंबई: मीरा-भाईंदर ही जैनांची नगरी आणि मिनी राजस्थान; भाजप आमदार नरेंद्र मेहतांच्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण तापले
- पुणे: नवले पुलाखाली वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली; पोलिसांसमोरच झेब्रा क्रॉसिंगचे उल्लंघन सुरू
- बुलढाणा: शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी बुलढाण्यात महामोर्चा; हेक्टरी १ लाखांच्या मदतीसह विविध मागण्यांसाठी ठाकरे सेना आक्रमक
गुन्हा
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप



























Subscribe to my channel




