मुंबईत गेल्या काही दिवसांपासून हवेचा स्तर बिघडत चालला आहे. वायूप्रदूषण प्रचंड वाढल्याचं दिसत असून AQIवरही परिणाम दिसून आला. गेल्या काही वर्षांपासून हिवाळा आला की मुंबईतील प्रदूषण वाढते आहे. त्यामुळे आता शहरातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी आणि हवेतील धूलिकरण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसून तयारी सुरू केली आहे. आता शहरातील वायूप्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेचा घनकचरा विभाग कामाला लागला असून रस्त्यांवर उडणारी धूळ रोखण्यासाठी वर्षभर रस्ते धुण्यात येणार आहेत. पावसाळा वगळून उरलेल्या सुमारे दीडशे दिवसांसाठी रस्ते धुण्याकरीता 125 पाण्याचे टँकर भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. तसेच शहरांतील गल्लोगल्लीतील रस्ते धुण्यासाठी यामध्ये लहान टँकरही घेण्यात येतील, अशी माहिती समोर आली आहे.
मुंबईचे रस्ते फॉरेनच्या रोड सारखे चमकणार
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून हवेचा स्तर बिघडत चालला आहे. त्यामुळे नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागतोय. वायू प्रदूषणाबाबत मुंबई महापालिकेने यापूर्वीच तयार केलेली नियमावली पुन्हा एकदा लागू करण्यात येणार आहे. पावसाळा सोडा तर इतर महिन्यांत मुंबईत प्रदूषणाची पातळी प्रचंड वाढते. बांधकाम, रस्त्यावरील वाहनाची वर्दळ, धूळ या सर्वांमुळेच प्रदूषणाच्या पातळीत खूप वाढ झालेली दिसून येते. त्यामुळे रस्त्यांवर साचणारी धूळ दाबण्यासाठी उपाय म्हणून पालिकेने दोन गटांत ही निविदा प्रक्रिया राबवली आहे. आता अत्याधुनिक मोबाईल वॉटर मिस्टिंग आणि स्प्रिंकलर यंत्रणा भाडेतत्त्वावर तैनात करण्यात येणार आहे. यामध्येवाहनांवर आधारित मोबाईल मिस्टिंग युनिट्सचा समावेश असेल.
यापूर्वीही ही धूळ हटवण्यासाठी रस्ते पाण्याने धुण्याचा पर्याय मुंबई महापालिकेने आणला होता. त्याकरीता काही टँकरही भाड्याने घेण्यात आले होते. मात्र या टँकर्सं कॉन्ट्रॅक्ट संपलं असून आता नव्याने 125 टँकर हे भाड्याने घेतले जाणार आहेत. मुंबईतील रस्ते धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याच्या टँकरची संख्या यंदा वाढवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने घेतला आहे. त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या असून 125 पाण्याचे टँकर भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत.
पावसाळ्याचे काही महिने सोडले, तर इतर कालावधीत या टँकरच्या सहाय्याने सुमारे 150 दिवस मुंबईतील रस्ते धुण्यात येणार आहेत अशी महिती समोर आली आहे. मात्र मोठया पाण्याच्या टँकरने गल्लोगल्लीतील रस्ते धुणे अवघड होतं, हे लक्षात घेऊन छोट्या गल्ल्यांसाठी यंदा लहान टँकरही भाड्याने घेण्यात येणार आहेत. त्यामुळे आता मुंबईचे रस्ते एकदम स्वच्छ, चकाचक दिसतील हे नक्की.
शहर
- मुंबई: अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता आता तुकाराम मुंढेंच्या रडारवर!
- पुणे: बारामतीच्या प्रकाशवैभवाचा जगभर डंका! काशीविश्वेश्वर पुलाच्या 'कॅनोपी ऑफ लाइट्स' प्रकल्पाला मानाचा आंतरराष्ट्रीय 'लाईट जस्टिस अवॉर्ड २०२६' जाहीर!
- पुणे: दहीहंडी वाहतूक अलर्ट; शहरात मोठे वाहतूक बदल आणि निर्बंध लागू, प्रशासनाकडून पर्यायी मार्गांची घोषणा!
- पुणे: हो, आमच्याकडून चुका झाल्या, आवाज आणि स्पर्धा वाढली, आता नियमांचे पालन करू गणेशोत्सवापूर्वी पुणे साऊंड व्यावसायिकांची मोठी कबुली!
महाराष्ट्र
- मुंबई: अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता आता तुकाराम मुंढेंच्या रडारवर!
- पुणे: बारामतीच्या प्रकाशवैभवाचा जगभर डंका! काशीविश्वेश्वर पुलाच्या 'कॅनोपी ऑफ लाइट्स' प्रकल्पाला मानाचा आंतरराष्ट्रीय 'लाईट जस्टिस अवॉर्ड २०२६' जाहीर!
- सिंधुदुर्ग: दोडामार्गात 'ओंकार' हत्तीचे प्रचंड तांडव! शेती आणि बागायतीचे मोठे नुकसान, ग्रामीण भागात भीतीचे वातावरण!
- चिपळूण: महसूल विभागात खळबळ! जमिनीच्या फेरफार नोंदीसाठी १० हजारांची लाच घेताना मंडल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!
गुन्हा
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
- सांगली: पलूसमध्ये घरगुती वादातून पती-पत्नीचे टोकाचे पाऊल; विषारी औषध प्राशन करून दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड
- उत्तराखंड: पूर आलेली नदी पार करताना हातातून निसटली चिमुकली, लेकीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात मारली उडी अन् दोघींचाही मृत्यू
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला



























Subscribe to my channel




