सातारा: कॉलेज हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून तरुणीचे टोकाचे पाऊल, शिक्षुता वर्तुळात व महाविद्यालयात शोककळा!

सातारा: शहरातील एका महाविद्यालयातील वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बुधवार, दि. २ रोजी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. सृष्टी भानुदास बिरामणे (वय १९, रा. आंब्रळ, ता. महाबळेश्वर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली प्राथमिक माहिती अशीः सृष्टी ही यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात फूड अँड टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेत होती. दोन दिवसांपूर्वी ती पाचगणी (आंब्रळ) येथे आपल्या गावी गेली होती. त्यावेळी तिने रूममधील मुलीकडून त्रास होत असल्याचे कुटुंबीयांना सांगितले होते. दरम्यान, बुधवारी तिने वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे कुटुंबियांना समजल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला. तिची आई आणि वडील तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात आले. मुलीचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला.

सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी सृष्टीला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. तिच्या खिशामध्ये पोलिसांना एक चार ओळींची चिठ्ठी सापडली असून, या चिठ्ठीत तिने नेमके काय लिहिले आहे, हे अद्याप समोर आले नाही.

घटनाक्रम 'सीसीटीव्हीत' कैद
सृष्टीने आत्महत्या केल्याने तिच्या आत्महत्येचे गूढ वाढले आहे. मात्र, वसतिगृहातील सीसीटीव्हीमध्ये हा सारा प्रकार कैद झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

सूचना: ही बातमी उपलब्ध माहिती व अधिकृत स्रोतांच्या आधारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत तपास व पुढील घडामोडींनुसार माहितीमध्ये बदल होऊ शकतो.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *