मुंबई: राजधानी मुंबईतून सायबर फसवणुकीची एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. अमेरिकन डॉलरशी संबंधित क्रिप्टोकरन्सीच्या (USDT) व्यवहारात तब्बल ४० लाख रुपयांची गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने ४० लाख रुपये स्वीकारून त्या बदल्यात ४१ हजार युएसडीटी पाठवल्याचा पूर्णपणे बनावट व्हॉट्सॲप स्क्रीनशॉट (WhatsApp Screenshot) दाखवून एका २४ वर्षीय तरुणाची फसवणूक केली. याप्रकरणी विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे.
काय आहे नेमकी घटना? पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, फसवणूक झालेला तरुण हा मूळचा शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्याचे काम करतो. मे २०२६ मध्ये त्याची ओळख मित्र हैदरअली बेग याच्यामार्फत 'ओम' नावाच्या व्यक्तीसोबत झाली होती. या ओम नावाच्या व्यक्तीने बाजारातील चालू दरापेक्षा कमी आणि स्वस्त दरात युएसडीटी (USDT) मिळवून देणारी व्यक्ती ओळखीत असल्याचे सांगून तरुणाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी तरुणाने व्यवहारासाठी तयारी दर्शवली.
या ठरल्या गेलेल्या व्यवहाराची पूर्तता करण्यासाठी १० जून रोजी मदनपुरा, नागपाडा येथे फिर्यादीची भेट ओम, सुफियान आणि समीर उर्फ सलमान या आरोपींसोबत झाली. त्यावेळी त्या ठिकाणी क्रिप्टोकरन्सीचा (USDT) बाजारभाव ९८ रुपये प्रति डॉलर असताना, समीरने ९७ रुपये दराने ती उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवले. आपला दावा खरा ठरवण्यासाठी त्याने स्वतःच्या मोबाईल ॲपमधील वॉलेटमध्ये युएसडीटीची मोठी शिल्लक असल्याचे दाखवून तरुणाचा पूर्णपणे विश्वास जिंकला.
कशी केली ४० लाखांची फसवणूक? तरुणाकडे स्वतःचे क्रिप्टोकरन्सी ॲप नसल्यामुळे, दुबईत काम करत असलेला त्याचा मित्र 'हैदरअली बेग' याच्या वॉलेटमध्ये ही युएसडीटी घेण्याचे ठरले. त्यानुसार ११ जून रोजी विलेपार्ले पूर्वेकडील एका कॅफेमध्ये (वाँफल कॅसल कॅफे) प्रत्यक्ष व्यवहार पार पडला. या व्यवहारादरम्यान समीर उर्फ सलमान याने त्याच्या परिचिताच्या म्हणजेच अब्दुल कादर ममतुले यांच्या 'सिल्वरलाईन इंटरनॅशनल' कंपनीच्या बँक खात्यातून तब्बल ४० लाखांची रक्कम परस्पर वळती करून घेतली.
रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर, समीरने ४१ हजार युएसडीटी ट्रान्सफर केल्याचे सांगत मोबाईलवर एक व्हॉट्सॲप स्क्रीनशॉट दाखवला. परंतु, जेव्हा खात्री करण्यात आली तेव्हा समीरने दाखवलेले व्यवहाराचे ते सर्व स्क्रीनशॉट पूर्णपणे बनावट आणि खोटे असल्याचे निष्पन्न झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने विचारणा केली असता, तोतया आणि चलाख आरोपींनी तिथून पळ काढला. त्यानंतर समीरला वारंवार फोन करून व संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेर या प्रकरणी पीडित तरुणाने विलेपार्ले पोलिसांत धाव घेतली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवत पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
























Subscribe to my channel


