अजित पवारांच्या राष्ट्रवादीची स्थिती काय ?
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. सुरुवातीचे कल हाती आले आहेत. जिल्हा परिषदेच्या 12 पैकी 12 जिल्हा परिषदांचे कल हाती आले आहेत. तर पंचायत समितीच्या 125 पैकी 106 जिल्हा परिषदांचे कलही हाती आले आहेत. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांनी या निवडणुकीचा प्रचार केला होता. त्यांच्या निधनानंतर या निवडणुकीचा निकाल हाती येत आहे. त्यामुळे अजितदादांचा पक्ष कितव्या स्थानी आहे, याचं कुतुहूल सर्वांनाच लागलं आहे. बारामतीचा निकाल काय लागला? याकडेही राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे.
अजितदादा यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीने प्रचार न करण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रवादीसह राज्यातील सत्तेतील आणि विरोधी पक्षानेही निवडणुकीचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या निवडणुकीत कुणाचं वर्चस्व होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अपेक्षेप्रमाणे या निवडणुकीत भाजपचं वर्चस्व निर्माण झालं आहे. भाजपने 12 पैकी 7 जिल्हा परिषदांमध्ये आघाडी घेतली आहे. तर 106 पैकी 40 पंचायत समित्यांमध्ये आघाडी घेतली आहे. तर अजितदादा यांच्या राष्ट्रवादीने 12 जिल्हा परिषदांपैकी एका आणि 125 पंचायत समित्यांपैकी 20 पंचायत समित्यांमध्ये वर्चस्व निर्माण केलं आहे. जिल्हा परिषदेत अजितदादांचा पक्ष तिसऱ्या तर पंचात समितीतही अजितदादांचा पक्ष तिसऱ्या स्थानावर राहिला आहे.
बारामतीत वर्चस्व
बारामती पंचायत समितीच्या 12 पैकी 9 जागांवर राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे. यातील एका जागेवर अजितदादा गटाच्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आलं आहे. तर भाजपने केवळ दोन जागांवर आघाडी घेतली आहे. तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना जिल्हा परिषदेत तीन जागांवर आघाडी घेऊन दुसऱ्या तर पंचायत समितीत 24 जागांवर आघाडी घेऊन दुसऱ्या स्थानावर राहिला आहे.
ठाकरे गट आणि काँग्रेसची सुमार कामगिरी
या निवडणुकीत ठाकरे गट आणि काँग्रेसची कामगिरी अत्यंत सुमार राहिली आहे. ठाकरे गटाला जिल्हा परिषदेत खातंही खोलता आलं नाही. तर पंचायत समितीच्या निवडणुकीत फक्त पाच जागांवर ठाकरे गट आघाडीवर आहे. ठाकरेंच्या तुलनेत काँग्रेसची कामगिरी थोडी बरी झाली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने एका जागेवर तर पंचायत समितीत 8 जागांवर आघाडी घेतली आहे. या निवडणुकीत महायुतीचं वर्चस्व राहिलं असून महाविकास आघाडीचं पुरतं पानीपत झालेलं पाहायला मिळत आहे.
शहर
- सिंधुदुर्ग: कणकवलीत ATM फोडण्याचा डाव उधळला,रोख रक्कम लंपास करण्याआधीच चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
- पुणे: ATS ची धडक कारवाई, पाकिस्तानी गँगस्टरशी कथित संपर्कप्रकरणी ६६ जण रडारवर; सकाळपासून चौकशी सुरू
- पुणे: पंढरीच्या वाटेवर तुकोबांची पालखी: भांडगावात पहिला विसावा, तर वरवंडमध्ये भाविकांकडून भक्तिमय स्वागत!
- नवी मुंबईत अमानवीय हत्याकांड! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, ११ महिन्यांनंतर गुन्ह्याचा उलगडा
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: कणकवलीत ATM फोडण्याचा डाव उधळला,रोख रक्कम लंपास करण्याआधीच चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
- पुणे: ATS ची धडक कारवाई, पाकिस्तानी गँगस्टरशी कथित संपर्कप्रकरणी ६६ जण रडारवर; सकाळपासून चौकशी सुरू
- पुणे: पंढरीच्या वाटेवर तुकोबांची पालखी: भांडगावात पहिला विसावा, तर वरवंडमध्ये भाविकांकडून भक्तिमय स्वागत!
- नवी मुंबईत अमानवीय हत्याकांड! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, ११ महिन्यांनंतर गुन्ह्याचा उलगडा
गुन्हा
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ई-२० (E20) पेट्रोलबाबत केंद्र सरकारची झोप उडवणारा सर्व्हे; मायलेजमधील घट आणि इंजिन खराब होण्याच्या भीतीने जनता चिंतेत, एनडीए समर्थकही विरोधात
- हरमुझ सामुद्रधुनीत इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; भारतीय नाविक ठार, भारताने इराणच्या राजदूताला बजावले समन्स
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! आसाममधील २७ जणांना 'परदेशी' ठरवणारे उच्च न्यायालयाचे निर्णय रद्द; नागरिकत्वाचा निर्णय निष्पक्ष प्रक्रियेने घेण्याचे आदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
























Subscribe to my channel




