फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅनुएल मॅक्रो भारत दौऱ्यावर आहेत. मंगळवारचे मुंबईतले कार्यक्रम आटोपून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत दिल्लीला येतील. दोन्ही नेत्यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर मिडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आलाय की, भारत फ्रान्सकडून राफेल विमाने विकत घेईल. फ्रान्स भारताकडून पिनाका रॉकेट लॉन्चर विकत घेईल. पिनाका भारतात बनवण्यात आलेली स्वदेशी मल्टी-बॅरल रॉकेट लॉन्चर सिस्टिम आहे. फ्रान्स भविष्यात पिनाका रॉकेट प्रणालीची खरेदी आणि संयुक्त उत्पादनावर विचार करु शकतो. फ्रान्सची आधीपासूनच भारतासोबत राफेल फायटर जेट्स, हेलिकॉप्टर इंजिन, सबमरीन टेक्नोलॉजी आणि रडार सिस्टिम अशा अनेक क्षेत्रात मजबूत भागिदारी आहे.
याच निमित्ताने जाणून घेऊया पिनाका काय आहे? त्याची मारक क्षमता किती आहे? फ्रान्सकडे आधीपासूनच अशी प्रणाली आहे का?. पिनाका भारतीय संरक्षण संशोधन विकास संस्था DRDO ने विकसित केलेली एक अत्याधुनिक मल्टी-बॅरल रॉकेट लॉन्चर (MBRL) सिस्टिम आहे. भगवान शंकराचं धनुष्य पिनाक वरुन या रॉकेट सिस्टिमला पिनाका नाव देण्यात आलं आहे. आधुनिक युद्ध क्षेत्रात ही प्रणाली घातक फायर पावर देते. काही किलोमीटर अंतरावरील टार्गेट वेगवान गतीने नष्ट करण्याची या सिस्टिमची क्षमता आहे. भारतीय संरक्षण उद्योग क्षेत्रातील कंपन्यांच्या मदतीने ही रॉकेट सिस्टिम बनवण्यात आली आहे. पिनाका रॉकेट सिस्टिम ही मेक इन इंडियाच्या प्रमुख यशापैकी एक आहे.
पिनाकाचे किती वर्जन आहेत?
पिनाका Mk-I : याची रेंज 37.45 किलो मीटर आहे. ही सिस्टिम आपल्या एक लॉन्चरवरुन अवघ्या 44 सेकंदात एकूण 12 रॉकेट्स (Salvo) डागण्यास सक्षम आहे.
पिनाका Mk-II : याची रेंज 60.75 किलोमीटर आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे उत्तम नेविगेशन, उच्च-प्रिसिजन आणि जास्तं स्फोटक वाहून नेण्याची क्षमता.
गायडेड पिनाका : याची रेंज 75.90 किमी आहे. ही सिस्टिम GPS/INS आधारित गायडन्ससह टार्गेटवर अचूक प्रहार करण्यास सक्षम आहे.
अत्याधिक क्षेत्रीय विनाश क्षमता : एका पिनाका बॅटरीमध्ये सहा लॉन्चर वाहन असतात. प्रत्येकात 12 रॉकेट्स आहेत. याचा अर्थ एक बॅटरीमधून 72 रॉकेट अवघ्या 44 सेकंदात डागता येतात. फुटबॉल स्टेडियम सारखा मोठा भाग ही रॉकेट्स उद्धवस्त करु शकतात.
वेगाने तैनाती आणि रिलोकेशन : पिनाकाचा रॉकेट लॉन्चर काही मिनिटात आपली पोजीशन बदलू शकतो. शत्रुच्या रडारने हेरुन हल्ला केला, तरी लगेच जागा बदलता येते.
अचूकता चांगला गायडन्स : गायडेड पिनाकामध्ये इनर्शियल नेविगेशन सिस्टम (INS) आणि सॅटेलाइट गायडन्सचा उपयोग होतो. पारंपरिक रॉकेटपेक्षा या सिस्टिममधून हल्ला अधिक घातक आणि अचूक होतो.
स्वदेशी आणि कमी खर्च : रशियन स्मर्च आणि अमेरिकी हिमार्स सारख्या परदेशी प्रणालीच्या तुलनेत याची किंमत खूप कमी आहे. त्याच्या तुलनेत पिनाकाच प्रदर्शन बरोबरीच नाही, तर उत्तम आहे.
वाळवंट, डोंगर,मैदान किंवा कमी तापमान असलेला भाग या ठिकाणी सुद्धा तितक्याच घातकतेने, अचूकतेने प्रहार करण्यास सक्षम.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



