आपल्यापैकी कोणीही हे नाकारू शकत नाही की, आजही आपल्या देशात अन्नातील भेसळ ही एक गंभीर समस्या आहे. अन्यथा संपूर्ण भारतात महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांची चर्चा झाली नसती, ज्यांनी पुन्हा एकदा देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. खऱ्या आयुष्यातील सिंघम म्हटले जाणारे मुंढे यांनी त्यांच्या 2 दशकांच्या सेवेत 25 बदल्या सहन केल्या आहेत. त्यांनी मे 2026 मध्ये एफडीएमध्ये पदभार स्वीकारला व अल्पावधीतच राज्यभरातील खाद्यपदार्थांची ठिकाणे व अन्न उत्पादकांवर हाय-प्रोफाइल छापे टाकून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. त्यांचा हेतू स्पष्ट होता- भेसळयुक्त अन्न व अस्वच्छ पद्धतींचा पर्दाफाश करणे. त्यांच्या कारवाईमुळे अनेक बड्या क्लब्सना फूड-हायजीनशी संबंधित त्यांच्या पद्धतींचे पुनरावलोकन व त्यात सुधारणा करण्यास भाग पाडले. माझ्यासाठी भेसळ ही एक संधी निर्माण करते. कल्पना करा, जर कोणी 500-1000 रुपयांपर्यंतचे फूड-टेस्टिंग उपकरण बनवले. स्मार्टफोनला जोडलेले एक छोटेसे रीडर, जे डिस्पोजेबल स्ट्रिप्स किंवा सेन्सरच्या मदतीने अन्नाच्या काही वैशिष्ट्यांची तपासणी करू शकेल व एवढेच सांगेल की ‘संभाव्य भेसळ आढळली, लॅब कन्फर्मेशन आवश्यक आहे.’ हे भविष्यातील एक पाऊल असू शकते. येथे ‘संभाव्य’ हा शब्द महत्त्वाचा आहे. असे उपकरण केवळ स्क्रीनिंग टूल असावे, चुकीच्या पद्धतीने स्वतःलाच लॅब म्हणून सांगणारे नसावे. या तंत्रज्ञानाचा वापर शाळा, रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन, फूड मार्केट व स्थानिक स्वराज्य संस्थादेखील करू शकतात. मी आज दैनंदिन इनोव्हेशनबद्दल यासाठी बोलत आहे. कारण याच आठवड्यात मला समजले की लखनऊच्या मेदांता हॉस्पिटलमधील इमर्जन्सी मेडिसिन अँड ट्रॉमा केअरचे संचालक डॉ. लोकेंद्र गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील इमर्जन्सी फिजिशियन्सच्या टीमला पेटंट ऑफिसकडून एका इंटिग्रेटेड इमर्जन्सी ट्रान्सपोर्ट स्ट्रेचरसाठी डिझाइन रजिस्ट्रेशन मिळाले आहे. गंभीर रुग्णांना रुग्णालयात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना त्यांची काळजी अधिक चांगल्या प्रकारे घेणे हा या स्ट्रेचरचा उद्देश आहे. या इनोव्हेशनची सुरुवात कोणत्याही लॅबमध्ये नाही, तर डॉक्टरांनी पाहिलेल्या एका समस्येतून झाली- जर एखाद्या रुग्णाला नेताना सीपीआरची गरज पडली तर काय होईल? हाच फेल्युअर पॉइंट लक्षात ठेवून टीमने हे डिझाइन तयार केले. या स्ट्रेचरला 6 मोड्समध्ये कॉन्फिगर केले जाऊ शकते, ज्यामध्ये आयसीयू, इमर्जन्सी/सीपीआर, रेडिओलॉजी, सर्जिकल प्रोसिजर, चेअर व ट्रान्सपोर्ट मोडचा समावेश आहे. यात एक्सपेंडेबल सीपीआर प्लॅटफॉर्म, इंटिग्रेटेड पेशंट मॉनिटरिंग सिस्टिम, ऑक्सिजन व सक्शन ॲक्सेस, इमर्जन्सी स्टोअरेज, सेफ्टी हार्नेस, रेडिओलुसेंट इमेजिंग कॅपेबिलिटी, 4 युटिलिटी पोर्ट््स, हाइट ॲडजस्टमेंट व बॅटरी बॅकअप यांसारख्या सुविधा आहेत. टीमच्या मते, गंभीर रुग्णांना रुग्णालयात इकडे-तिकडे नेतानाही इमर्जन्सी व क्रिटिकल केअरच्या सुविधा अखंडपणे मिळत राहतील, याची खात्री करणे हा यामागचा उद्देश आहे. या इनोव्हेशनकडे उपचारातील अडथळा म्हणून न पाहता, उपचारातील सातत्य म्हणून पाहिले पाहिजे. डिझाइन रजिस्ट्रेशननंतर आता ही टीम संभाव्य क्लिनिकल वापरासाठी इंजिनिअरिंग डेव्हलपमेंट, टेस्टिंग व प्रमाणीकरणाची योजना आखत आहे. फूड सेफ्टी हा समस्येचा फक्त अर्धा भाग आहे, दुसरा भाग खाद्यपदार्थ खराब होणे हा आहे. आयसीएआरच्या अंदाजानुसार, भारतात पीक कापणीनंतर 6-18% पर्यंत नासाडी होते, तर देशात दरवर्षी 315 दशलक्ष टनांहून अधिक फळे व भाज्यांचे उत्पादन होते. याचा अर्थ असा की, इनोव्हेशनची गरज केवळ उत्पादनातच नाही, तर अन्न शेतातून ताटापर्यंतच्या प्रवासातही आहे. इंटेलिजेंट प्रोड्यूस क्रेट ही अशीच कल्पना आहे. असा क्रेट, ज्यामध्ये लावलेले परवडणारे सेन्सर तापमान, आर्द्रता, कंपन, ट्रान्झिटचा कालावधी व निवडक उत्पादनांसाठी इथिलीन पातळीवर लक्ष ठेवतील. व शेवटी अशी पूर्वसूचना देऊ शकतील की ‘टोमॅटो खराब होणार आहे.’ तंत्रज्ञानाच्या विद्यार्थ्यांकडे असे व्यावहारिक शोध लावण्याची मोठी संधी आहे, जे मृत्यू रोखू शकतील, जीवनमान उंचावतील, अन्न सुरक्षित ठेवतील व सर्वांसाठी दैनंदिन व्यवस्था अधिक सुरक्षित बनवतील. त्यांच्या इनोव्हेशनचा उद्देश नेहमीच केवळ सुरक्षा नसावा. हे एखाद्या वृद्ध किंवा दिव्यांग व्यक्तीची प्रतिष्ठा, कोणाचा तरी वेळ किंवा पैसा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे सोयी-सुविधांसारखे क्षेत्र असू शकते. फंडा हा आहे की, आपल्या देशातील लोकसंख्येचे दैनंदिन जीवन पाहता आपल्या आजूबाजूला एक आनंदी समाज निर्माण करू शकतील असे सोपे मार्ग विकसित करण्यात इनोव्हेशनला खूप वाव आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: 'म्हाडा'च्या घरांसाठी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद! तब्बल २.३८ लाख अर्ज दाखल, अर्ज भरण्यासाठी उरले केवळ ३ दिवस
- पुणे: राणा सूर्यवंशींना 'वाय प्लस' सुरक्षा कशासाठी? आमदार रोहित पवारांचा संतप्त सवाल; सखोल चौकशीची मागणी
- पुणे: पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या हर्षदा जाधव-देशमुख विजयाच्या उंबरठ्यावर! विजयासाठी केवळ १८१६ मतांची गरज, भाजपच्या स्मिता जाधव पिछाडीवर
- पुणे: शिक्षक मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का! विद्यमान आमदार जयंत आसगावकर पराभूत, भाजपच्या कौस्तुभ गावडेंचा विजयाचा मार्ग मोकळा
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीवर महत्त्वाची बैठक! अखिल भारतीय किसान सभेच्या मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सकारात्मक मदतीची ग्वाही
- पुणे: 'म्हाडा'च्या घरांसाठी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद! तब्बल २.३८ लाख अर्ज दाखल, अर्ज भरण्यासाठी उरले केवळ ३ दिवस
- रायगड: महायुतीत मोठा वाद पेटला! खासदार सुनील तटकरेंनी आपल्याला संपवण्याची सुपारी दिल्याचा शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंचा सनसनाटी आरोप
- पुणे: राणा सूर्यवंशींना 'वाय प्लस' सुरक्षा कशासाठी? आमदार रोहित पवारांचा संतप्त सवाल; सखोल चौकशीची मागणी
गुन्हा
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
- पुणे: भरवस्तीत तरुणीला बळच उचलून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ, संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून दिला पोलिसांच्या हातांत
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

28 October 2026
28 October 2026
सीतापूरमध्ये रोडवेज बस आणि टेम्पोची भीषण धडक; दोघे गंभीर जखमी!
देश विदेश
- गोवा: विक्रोळीतील २१ वर्षीय विद्यार्थी कुशाग्र पटालेचा दुचाकी-टॅक्सी अपघातात दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: काँग्रेसशासित कर्नाटकात खळबळ: एसआयआर (SIR) प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी जाहीर, तब्बल १ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली!
- गोवा: भाजप अध्यक्ष नितीन नबीन दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर; बैठकांचा धडाका लावत मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांना दिले महत्त्वाचे मार्गदर्शन!
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार रात्री उशिरा सुप्रीम कोर्टात पोहोचले; प्रतिज्ञापत्रातून मांडली सविस्तर भूमिका!


























Subscribe to my channel




