Crime News : डॉक्टरनेच केली २१ वर्षीय महिला पेशंटची छेडछाड; घटनेच्या निषेधार्थ परळी बंदची हाक

Maharashtra : बीडच्या परळीत एक धक्कादायक घटना घडली आहे. परळीत एका खाजगी रुग्णालयात एका महिला पेशंटची छेडछाड करण्यात आली आहे.एका २१ वर्षीय महिला पेशंटची छेडछाड करण्यात आली आहे. याप्रकरणी डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

परळी शहरातील खाजगी रुग्णालयात ही घटना घडली आहे. या संतापजनक घटनेनंतर पीडित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. महिलेच्या कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेद केला आहे. याप्रकरणी डॉक्टरवर करावाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

या घटनेचे गांभीर्य ओळखून परळी शहर पोलिस ठाण्यामध्ये डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल करुन घेतली आहे. पोलिसांनी आरोपी डॉक्टरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

MLC Election : विधानसभा झाली, आता परिषदेसाठी नेत्यांची लॉबिंग

दरम्यान या घटनेनंतर डॉक्टरवर कारवाई करण्यात यावी, यासाठी नागरिकांनी परळी शहर बंदची हाक दिली आहे. यामुळे आज सकाळपासूनच परळी शहर बंद असल्याचे पाहायला मिळत आहे. व्यापऱ्यांनीही दुकाने बंद ठेवली आहे. महिलेवर झालेल्या या अत्याचारासाठी परळीकर एकत्र आले आहे. जर डॉक्टरांनी एखाद्या पेशंटसोबत असं कृत्य केलं तर त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

बेलापूरमध्ये हाणामारी

नुकतीच बेलापूरमध्येही एक धक्कादायक घटना घडली आहे. बेलापुरात शुल्लक कारणावरुन हाणामारीची भयंकर घटना घडली आहे. शेजाऱ्या व्यक्तीने ९ महिन्यांच्या बाळावर कुऱ्हाडीने वार केले आहे. या घटनेने आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply