
Pune : 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकराणात पक्षानिष्ठा, विचारधारा, तत्व आणि घटनात्मक मूल्य कशाबरोबर खातात याचाच विसर राज्यातील सर्वच पक्षांना अन् पक्षातील बड्या समजल्या जाणाऱ्या नेत्यांना पडलाय, असंच म्हणावं लागेल. कारण विकासाच्या गोंडस नावाखाली कोणता पक्ष कधी कोणासोबत युती - आघाडी करेल याचा काही नेम राहिला नाही. बरं पक्षच नाही तर विचारधारेच्या गप्पा मारनारे नेते सुद्धा सत्तेचं पद आपल्याच घरात हवं यासाठी कधी कोणत्या पक्षात उडी मारतील किंवा आपल्या घरातील व्यक्ती हे व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली दुसऱ्या पक्षात पाठवतील याचा तर विचार सुद्धा करवत नाही.
काही वर्षांपूर्वी कोल्हपुरातील महाडिक घराणं असच सत्तेची सगळे पद आपल्याच घरात असावे यासाठी प्रसिद्ध होतं. महादेवराव महाडिक हे काँग्रेसचे विधानपरिषद आमदार होते. त्याचवेळी त्यांचे पुत्र हे राष्ट्रवादीचे खासदार झाले तर पुढच्या सहा महिन्यातच त्यांचे दुसरे पुत्र अमल महाडिक भाजपचे आमदार झाले. इतकंच नाही तर महापालिकेत महाडिक कुटुंबाची ताराराणी आघाडी झाली, म्हणजे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता ही आपल्याच घरात हे सूत्र महाडिक कुटुंबाने अवलंबलं होतं. आता याचा पुढचा अंक पुण्यातील पठारे कुटुंबात पाहायला मिळत आहे.
|
|
2024च्या लोकसभा निवडणुकीवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बापूसाहेब पाठरे यांच्यासह संपूर्ण कुटुंब हे भाजपमध्ये होते. पठारे यांनी भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचे काम केले. पुढे मोहोळ निवडून आले आणि केंद्रात मंत्री झाले. पण राज्यात महायुतीची अवस्था कहीं ख़ुशी कहीं गम अशी राहिली. त्याच वर्षी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत वारे पाहून पठारे यांनी थेट भाजपचे कमळ सोडत शरद पवारांची तुतारी हाती घेतली आणि वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवत थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे यांचा पराभव केला.
मात्र, महाविकास आघाडीची अवस्था राज्यात बिकट झाली. त्यामुळे पठारे यांनी पुन्हा आपल्या जुन्या नेत्यांशी घरोबा करायला सुरुवात केली. ते कधी अजित पवारांच्या मांचवार दिसत तर कधी भाजपच्या नेत्यांसोबत एखाद्या कार्यक्रमात सहभागी होत. पुढे महापालिका निवडणूक येताच पठारे कुटुंबानी निर्णय घेतला आणि बापूसाहेब पठारे वगळता त्यांचा मुलगा सुरेंद्र पठारे, सून ऐश्वर्या पठारे आणि काही समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मनपा निवडणुकीत सुरेंद्र आणि ऐश्वर्या पठारे भरघोस मतांनी विजयी देखील झाले. शरद पवारांचे आमदार असलेले पठारे महापालिका निवडणुकीत ना राष्ट्रवादीच्या प्रचारात दिसले ना महत्त्वाच्या बैठकींना उपस्थित राहिले.
पठारेंचे सोयीस्कर राजकारण इथेच थांबले नाही. तर आता जिल्हा परिषद निवडणुकीत बापूसाहेब पाठरे यांच्या दोन्ही मुली वेगवेगळ्या पक्षातून रिंगणात उतरल्या आहेत. बापूसाहेब पठारे यांची एक मुलगी पूनम अमोल झेंडे या दिवे गराडे गटातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत तर दुसरी मुलगी दीपाली राहुल गव्हाणे या भाजपकडून तळेगाव ढमढेरे रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गटातून भाजपच्या उमेदवार आहेत. त्यामुळे बापूसाहेब पठारे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार, मुलगा आणि सून भाजपचे नगरसेवक, एक मुलगी भाजपची झेडपी उमेदवार तर दुसरी मुलगी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची झेडपी उमेदवार असं सर्वपक्षीय सत्ताकेंद्र आपल्याच घरात ठेवण्याचा प्रयत्न पठारे यांनी केला आहे. पुण्यात बापूसाहेब पठारे आप्पा म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यामुळे आता पुणेकरांवर नाईलाजाने का होईना पण ‘आप्पाचा विषय लई हार्ड हे’ असंच म्हणण्याची वेळ आलीय, हे मात्र नक्की.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel





1 thought on “Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात”