
World Cup 2023 : विश्वचषकात टीम इंडिया ने गतविजेत्या इंग्लंड वर दणदणीत विजय मिळवला. भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडची फलंदाजी पुरती कोलमडली. यंदाच्या विश्वचषकात टीम इंडियाने सलग सहाव्या विजय मिळवला. लखनौच्या इकाना स्टेडिअमवर भारतीय संघाने इंग्लंडचा 100 धावांनी पराभव केला. भारताने 229 धावांच्या आव्हानाचा धडक गोलंदाजीसह बचाव केला. टीम इंडियाच्या गोलंदाजांननी इंग्लंडचा संपूर्ण संघ 129 धावांत गारद केला. रोहित शर्माच्या अर्धशतकानंतर मोहम्मद शामी आणि जसप्रीत बुमराह यांनी भेदक मारा केला. शामीने चार तर बुमराहने तीन विकेट घेतल्या. या विजयासह टीम इंडियाने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलेय. इंग्लंडचा विश्वचषकातील पाचवा पराभव होय. या पराभवासह इंग्लंडचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलेय.
भारताकडून इंग्लंडच्या पराभवाचा फायदा पाकिस्तानला
पाकिस्तान क्रिकेट संघाचे उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्न जवळपास भंगलं आहे, कारण त्यांच्या संघाला सहा पैकी फक्त दोन सामने जिंकता आले आहेत, तर गेल्या चार सामन्यांमध्ये सलग पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा स्थितीत पाकिस्तान क्रिकेट संघाला उपांत्य फेरी गाठणे फार कठीण वाटत असले तरी हे अशक्य नाही. आता पाकिस्तान क्रिकेट संघाला उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे. त्यासाठी पाकिस्तान संघाला उर्वरित तीन सामने जिंकावे लागतील आणि त्यासोबतच इतर संघांच्या कामगिरीवरही अवलंबून राहावं लागणार आहे.
|
IND Vs NZ : 20 वर्षानंतर 'किवीं'वर मात न्यूझीलंडला दणका देताना टीम इंडियाकडून विक्रमांचा डोंगर |
पाकिस्तान उपांत्य फेरीत कसा पोहोचेल?
पाकिस्तानचे क्रिकेट चाहते आता भारतीय संघाने उर्वरित सामने जिंकण्यासाठी प्रार्थना करतील, कारण भारताने आपले उर्वरित सामने असेच जिंकले तर पाकिस्तान संघासाठी उपांत्य फेरीचा मार्ग सुकर होईल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याचाही पाकिस्तानला फायदा झाला आहे. टीम इंडियाने इंग्लंडचा 100 धावांनी पराभव केला, त्यामुळे पाकिस्तान संघ आणि चाहते खूप आनंदी झाले आहेत, कारण आता इंग्लंडला उपांत्य फेरी गाठणं जवळपास अशक्य झालं आहे. विश्वचषकातील इंग्लंडचं आव्हान जवळपास संपलं आहे. आता मोठा करिष्माच इंग्लंडला उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवू शकतो. त्यासाठी इंग्लंड संघाला त्यांचे उर्वरित तीन कठीण सामने जिंकावे लागतील. इंग्लंडचा सामना आता ऑस्ट्रेलिया, नेदरलँड आणि पाकिस्तानशी होणार आहे.
पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी ीसमीकरण काय?
भारताविरुद्धच्या सामन्यातील इंग्लंडच्या पराभवाचा फायदा भारतासोबतच पाकिस्तानलाही झाला आहे. पाकिस्तान संघासाठी उपांत्य फेरीच्या शर्यतीत जितके कमी उमेदवार असतील, तितकी चांगली संधी आणि जास्त फायदा होईल. इंग्लंडचा संघ 100 धावांच्या फरकाने हरला तर त्यांचा निव्वळ धावगतीही कमी होईल. अशा परिस्थितीत पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठायची संधी मिळेल, तर पाकिस्तानला त्यांचे उर्वरित तीन सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. पाकिस्तानचे पुढील तीन सामने बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध होणार आहेत. अशा परिस्थितीत, पाकिस्तानला तीन सामने चांगल्या फरकाने जिंकावे लागतील, ज्यामुळे त्यांचे एकूण दहा गुण होतील आणि निव्वळ धावगती देखील सुधारेल. याशिवाय भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने आपले उर्वरित सर्व सामने जिंकावेत यासाठीही पाकिस्तानला प्रार्थना करावी लागेल. असं झालं तरंच पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




