
कोट्यवधी वापरकर्ते असणारं व्हॉट्सअॅप मंगळवारी दुपारी काळ बंद पडलं होतं. यामुळे जगभरातील व्हॉट्सअॅप युजर्सना याचा फटका बसला होता. अचानक झालेल्या या बिघाडामुळे वापरकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. सुरुवातीला तर अनेकांना आपल्या फोनमध्ये बिघाड झाला की काय? असाच प्रश्न पडला होता. सेवा ठप्प असल्याने व्हॉट्सअॅप वापरकर्ते मेसेज, ऑडिओ, व्हिडीओ यापैकी कोणतीही सेवा वापरण्यात असमर्थ ठरत होते. अखेर जवळपास दोन तासानंतर व्हॉट्सअॅप सेवा पूर्ववत झाली आणि कोट्यवधी वापरकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. आता या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने व्हॉट्सअॅपची मालकी असणाऱ्या मेटा कंपनीकडे या संदर्भात पाच दिवसात अहवाल सादर करण्याची मागणी केली आहे.
कारण, व्हॉट्सअॅप सेवा खंडीत झाल्यानंतर व्हॉट्सअॅपची मालकी असलेल्या मेटाकडे तक्रारींचा ओघ हा सुरुच होता आणि ट्विटरवर वापरकर्त्यांच्या संतापाची लाट पसरली होती. सुरुवातीला व्हॉट्सअॅपच्या सव्र्हरमध्ये बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. यासंदर्भात काही कालावधीनंतर व्हॉट्सअॅपकडून अधिकृतरीत्या प्रतिक्रिया देताना ‘लवकरात लवकर बिघाड दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करत आहोत’, अशी माहिती देण्यात आली. त्यानंतर दुपारी सव्वा दोनच्या सुमारास संदेश येणे-जाणे सुरु झाले.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने याबाबत कंपनीला पत्र पाठवून ‘आउटेज’ बद्दलचे नेमके कारण विचारले आहे. केंद्रीय दूरसंचामंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, “आम्ही व्हॉट्सअॅपला अहवाला मागितला आहे आणि पुढील चार-पाच दिवसांत तो येण्याची अपेक्षा आहे.”
सरकारने व्हॉट्सअॅपला आपला अहवाल इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमला सादर करण्यास सांगितले आहे.
सरकार सायबर हल्ल्याचा करत आहे तपास –
याशिवाय आयटी मंत्रालयाकडून याचा देखील तपास केला जात आहे की, व्हॉट्सअॅप डाउन होण्यामागचे कारण सायबर हल्ला तर नाही ना? यासंदर्भात आयटी मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी संस्था याबर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) सक्रीय झाली आहे.“आम्ही त्यांना विचारले आहे की आउटेज अंतर्गत कारणांमुळे झाले होते की बाह्य सायबर हल्ल्यामुळे झाले आहे. याबबात ते काही दिवसांमध्ये संबंधित तपशीलासह प्रतिसाद देतील.” असे मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




