पुणे: मोठ्या गाड्यांमधून फिरणाऱ्या आणि मोठ्या बंगल्यांमध्ये राहणाऱ्यांना पाच हजार रुपयांचे महत्त्व कधीही कळणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राज्यातील कमी पावसामुळे आणि दुष्काळी परिस्थितीमुळे तसेच पावसातील खंडामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दिवाळीपूर्वी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत जाहीर करण्यात आली आहे. या मदतीवरून विरोधकांनी सरकारवर टीका करत पाच हजार रुपयांत काय होणार, असा सवाल उपस्थित केला होता. या टीकेला उत्तर देताना फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
पुण्यातील मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटनानंतर आणि एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, ही मदत म्हणजे केवळ सुरुवात असून, यापुढेही सरकारकडून शेतकऱ्यांना आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. यापूर्वीच्या काळात दुष्काळ किंवा संकटाच्या काळात शेतकऱ्यांना केवळ एक हजार ते पंधराशे रुपयांपर्यंतची मदत मिळायची, मात्र या सरकारने थेट ५ हजार रुपयांची ऐतिहासिक आणि आतापर्यंतची सर्वाधिक अग्रिम मदत दिली आहे. कोणत्याही क्लिष्ट प्रक्रियेत शेतकऱ्यांना अडकवून न ठेवता ही मदत त्यांच्या खात्यात जमा करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली की, ज्यांनी यापूर्वी सत्तेत असताना नेहमीच शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, ते आज आमच्या मदतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. परंतु, सुखवस्तू वातावरणात जगणाऱ्या आणि महागड्या गाड्यांमधून फिरणाऱ्या नेत्यांना सामान्य शेतकऱ्यांच्या खिशातील पाच हजार रुपयांचे मूल्य कधीही समजणार नाही. राज्य सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, शेतकर्यांनी अजिबात चिंता करू नये, असा दिलासाही त्यांनी यावेळी दिला.
याच कार्यक्रमादरम्यान त्यांनी पुणे मेट्रो प्रकल्पाच्या कामांसोबतच इतर विकासकामांचा आढावा घेतला. तसेच मेट्रो स्थानकांमधील तांत्रिक अडचणींवर आणि विरोधकांच्या इतर मुद्यांवर देखील भाष्य केले. दरम्यान, अभिनेत्री दिया मिर्झा यांच्याशी संबंधित एका प्रश्नावर बोलताना त्यांनी हे प्रकरण अतिशय किरकोळ आणि न्यायालयीन पातळीवर फारसे महत्त्वाचे नसलेले असल्याचे स्पष्ट करत, हा अतिशय छोटा विषय असल्याचे म्हटले.
शहर
- पुणे: शंभराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणाकडे? पुण्यातील ऐतिहासिक सोहळ्याचा निर्णय आज!
- पुणे: बाईक टॅक्सीविरोधात ६० हजार रिक्षांचा चक्काजाम! पुण्यात प्रवासासाठी नागरिकांची मोठी धावपळ आणि तारांबळ
- पुणे: जेजुरी–मोरगाव रस्त्यावर काळोखाचा घाला! एसटी बसची दुचाकीला जोरदार धडक; पती-पत्नीचा जागीच मृत्यू, दोन चिमुकल्यांचे छत्र हरपले!
- पुणे: अहिल्यानगर महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात! दुभाजक ओलांडून कार पलटी आणि ट्रकला धडक; वाघोलीतील ३ तरुणांचा मृत्यू, २ जखमी!
महाराष्ट्र
- कोल्हापूर: पहाटेच्या मोजणीवरून नाधवडे शिवारात रणकंदन; बोरवडे आणि उंदरवाडीत शेतकऱ्यांचा रस्त्यावर संताप!
- पुणे: शंभराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणाकडे? पुण्यातील ऐतिहासिक सोहळ्याचा निर्णय आज!
- पुणे: बाईक टॅक्सीविरोधात ६० हजार रिक्षांचा चक्काजाम! पुण्यात प्रवासासाठी नागरिकांची मोठी धावपळ आणि तारांबळ
- पुणे: जेजुरी–मोरगाव रस्त्यावर काळोखाचा घाला! एसटी बसची दुचाकीला जोरदार धडक; पती-पत्नीचा जागीच मृत्यू, दोन चिमुकल्यांचे छत्र हरपले!
गुन्हा
- यवतमाळ: घाटंजी येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल; भाड्याने राहत असलेल्या खोलीत घेतला गळफास, परिसरात खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर सावंगी जवळ भीषण अपघात: चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी!
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!
- उत्तर प्रदेश: बुलंदशहरमध्ये धक्कादायक घटना! घरापासून ४० मीटर अंतरावरील बंद खोलीत चिमुकलीचा मृतदेह; जादूटोण्याच्या संशयाने खळबळ, संशयित महिला ताब्यात
- गोवा: पुढील वर्षापासून गोव्यात दुसरे मेडिकल कॉलेज, आयटीआयच्या दर्जावाढीसाठी २५० कोटींची तरतूद आणि मुख्यमंत्री चषक मॅरेथॉनचा शुभारंभ!


























Subscribe to my channel



