Tarique Rahman Bangladesh New Prime Minister: तारिक रहमान यांचा पक्ष BNP ने बांगलादेशातील 13 व्या सार्वजनिक निवडणुकीत महाविजय मिळवला. तारिक रहमान हे जियाऊर रहमान आणि खालिदा जिया यांचा मुलगा आहे. त्यांचे कुटुंब हे बांगलादेशातील सर्वात प्रभावशाली आहे. खालिदा जिया यांच्या मृत्यूनंतर रहमान हे BNP पक्षाचे प्रमुख झाले. त्यांनी पहिल्या निवडणुकीत मोठा विजय मिळवला. अर्थात त्यांच्या या विजयाला संशयाची दाट झालर सुद्धा आहे. शेख हसीना यांचे सरकार उलथवल्यानंतर यंत्रणा आणि कट्टरतावाद्यांचा रहमान यांना पाठिंबा होता हे काही लपून राहिले नाही. तारिक रहमान यांना गेल्या 17 वर्षांपासून परदेशात रहावे लागले. ते त्यांच्या वतनाला मुकले होते. पण पुन्हा एकदा सरकारची सूत्रं त्यांच्या हाती आली आहे. आता ते बांगलादेशाला दुसरा पाकिस्तान करतात की नवीन उंचीवर नेतात हे येणारा काळच ठरवेल.
तारिक यांचा जीवनप्रवास
तारिक रहमान यांना बांगलादेशाच्या राजकारणात तारिक जिया या नावाने ओळखले जाते. त्यांच्या आईचा प्रभाव त्यातून स्पष्ट दिसतो. त्यांचे कुटुंब हे सक्रिय राजकारणात पूर्वीपासूनच होते. ते जियाउर रहमान आणि खालिदा जिया यांचे पुत्र आहेत. त्यांचा जन्म 1967 मध्ये झाला होता. त्यावेळी बांगलादेश हा पूर्व पाकिस्तान होता. 1971 च्या मुक्तीवाहिनीच्या संघर्षात मुक्ती संग्रामात बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी तारिक केवळ चार वर्षांचे होते. त्यांना त्यावेळी ताब्यात घेण्यात आले होते. नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्यामुळेच त्यांचा पक्ष बीएनपी त्यांना युद्धातील सर्वात कमी वयाचा बंदिवान म्हणून त्यांचे कौतुक करतात.
त्यांचे वडील जियाउर रहमान हे लष्कराचे कमांडर होते. 1975 मध्ये त्यांनी तख्तापालट केला आणि सत्तेवर मजबूत पकड मिळवली. या घटनेमुळे बांगलादेशाच्या राजकारणात खालिदा जिया आणि शेख हसीना यांच्या कुटुंबात राजकीय वैर झाले. या घटनेला बेगमची लढाई म्हणून ओळखले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून बांगलादेशावर शेख हसीना यांची एकहाती सत्ता होती. पण आता त्यांना भारतात शरण यावे लागलेले आहे.
जेव्हा तारिक रहमान हे केवळ 15 वर्षांचे होते तेव्हा त्यांचे वडील जियाउर रहमान यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर आईच्या छत्रछायेत ते मोठे झाले. खालिदा जिया या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. दोन्ही बेगममध्ये राजकीय द्वंद सुरूच होते. 23 व्या वर्षापर्यंत तारिक यांनी ढाका विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय विषयावर पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला.
2007अटक आणि 2008 मध्ये सोडला देश
2007 मध्ये तारिक रहमान यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लागला. त्यांना अटक करण्यात आली. तुरुंगात त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. राजकारणात सक्रिय राहणार नाही आणि देश सोडणार या अटींवर त्यांची सुटका झाल्याचे मानले जाते. त्यांची सुटका झाल्यानंतर ते 2008 मध्ये लंडनाला गेले. आईच्या निधनानंतर इकडं शेख हसीना विरोधात विद्यार्थी आंदोलनाचं निमित्त करून त्यांना सत्तेतून दूर करण्यात आले. शेख हसीनांना देश सोडून पळ काढावा लागला. एक वर्षांपासून या देशात हंगामी सरकार कार्यरत होते. आता झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे बीएनपीचा विजय झाला. तर तारिक रहमान नवीन पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतील.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


