T20 World Cup 2026: मोहम्मद सिराजचं लकही अभिषेक शर्माला लाभेना! जर्सीसाठी वापरला टोटका; पण... Image Credit source: PTI
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत टीम इंडिया जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानली जात आहे. भारताने साखळी फेरीत चांगली कामगिरी केली आणि सुपर 8 फेरीत जागा मिळवली आहे. पण भारताचं टेन्शन भलत्याच कारणामुळे वाढलं आहे. ते कारण म्हणजे ऐन स्पर्धेत ढासळलेला अभिषेक शर्माचा फॉर्म.. अभिषेक शर्मा या स्पर्धेत तीन सामन्यात खेळला आणि तिन्ही वेळेस शून्यावर बाद झाला. साखळी फेरीत त्याच्या चुकांवर पांघरून घातलं गेलं. पण या चुका सुपर 8 आणि बाद फेरीत चालणार नाहीत. कारण येथे एक चूक जेतेपदाचं स्वप्न भंग करणारं ठरेल. त्यामुळे टीम इंडिया व्यवस्थापनाला त्याची जागा संजू सॅमसनला देणं भाग असल्याचं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सलग तीन सामन्यात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू ठरला आहे. म्हणजेच टी20 क्रिकेटमधील नंबर 1 खेळाडू या स्पर्धेत एकही धाव करू शकलेला नाही. दुबळ्या नेदरलँडविरुद्धच्या सामन्यातही त्याला नशिबाने साथ दिली नाही.
अभिषेक शर्मा नेदरलँडचा गोलंदाज आर्यन दत्तच्या चेंडूवर पूल शॉट मारण्याच्या नादात चुकला आणि क्लिन बोल्ड झाला. पण असं असताना यावेळी अभिषेक शर्माच्या जर्सीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कारण अभिषेक शर्मा यावेळी मोहम्मद सिराजची जर्सी परिधान करून मैदानात उतरला होता. हार्षित राणा दुखापतग्रस्त झाल्याने टी20 वर्ल्डकप संघात एन्ट्री मिळाली होती. त्यामुळे त्याला नशिबाची साथ मिळाली. इतकंच काय तर मोहम्मद सिराजला पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत संधी मिळाली होती. तेव्हा त्याने चांगली कामगिरी केली. पण जसप्रीत बुमराह पुन्हा आल्याने आता सिराजला बेंचवर बसला आहे. पण त्याचं नशिब जोरदार आहे असं अभिषेक शर्माचं म्हणणं आहे. त्यामुळेच त्याच्या नशिबाची साथ घेण्यासाठी अभिषेक शर्मा सिराजचची जर्सी परिधान करून उतरला होता.
अभिषेक शर्माला एक कळलं पाहिजे की, धावा जर्सी बदलून येत नाही. त्यासाठी योग्य चेंडूंची निवड करून चांगले शॉट मारावे लागतात. अभिषेक शर्माने आतापर्यंत स्पर्धेत फक्त 8 चेंडू खेळले आहे. अमेरिकेविरूद्धच्या सामन्यात गोल्डन डकवर बाद झाला होता. पाकिस्तानविरुद्ध 4 चेंडूंचा सामना करून, तर नेदरलँडविरूद्ध 3 चेंडूंचा सामना करून शून्यावर बाद झाला. अभिषेक शर्मा मागच्या 7 डावात पाचवेळा शून्यावर बाद झाला आहे. सलग शून्यावर बाद होण्याची मालिका पाहून क्रीडाप्रेमींचं टेन्शन वाढलं आहे. त्याच्या संजू सॅमसनला संधी देण्याची मागणी आता जोर धरत आहे.
शहर
- मुंबई: विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा आदेश; दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी योजना वाढवण्याचे संकेत
- मुंबई: राज ठाकरेंनी आंदोलनात जाऊन रोहित पवारांचे कान टोचले; भाजपचा जोरदार हल्लाबोल
- मुंबई: दुष्काळात रस्ते धुण्यासाठी मुंबई महापालिका ८ कोटी खर्च करणार; स्थायी समितीच्या बैठकीत वादंग
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
महाराष्ट्र
- सोलापूर: १६ वर्षांचा संसार मोडल्याने पत्नीला धडा शिकवण्यासाठी पतीने केले चक्क गाढविणीशी लग्न
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- मुंबई: विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा आदेश; दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी योजना वाढवण्याचे संकेत
- मुंबई: राज ठाकरेंनी आंदोलनात जाऊन रोहित पवारांचे कान टोचले; भाजपचा जोरदार हल्लाबोल
गुन्हा
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!























Subscribe to my channel



