T20 WC 2026, PAK vs NAM : पाकिस्तानने नामिबियाला 102 धावांनी केलं पराभूत, सुपर 8 फेरीत एन्ट्रीImage Credit source: Icc X account
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताकडून पाकिस्तानचा दारूण पराभव झाला होता. त्यामुळे सुपर 8 फेरीचं गणित नामिबियाविरुद्धच्या सामन्यावर अवलंबून होतं. या सामन्यात विजय मिळाला तर सुपर 8 फेरीत जागा मिळणार होती. अखेर पाकिस्तानने नामिबियाला पराभूत केलं आणि सुपर 8 फेरीत जागा पक्की केली. यामुळे अमेरिकेच्या उरल्यासुरल्या ज्या काही आशा होत्या. त्या संपुष्टात आल्या आहेत. या सामन्यात पाकिस्तानने प्लेइंग 11 मध्ये काही बदल केले होते. शाहीन शाह आफ्रिदीला प्लेइंग 11 मधून वगळलं. तसेच फलंदाजीत बाबर आझमला मैदानात उतरवलंच नाही. पाकिस्तानने या दोघांना काहीही वगळण्याचा निर्णय घेतल्याचं यातून दिसून आलं. पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. या सामन्यात पाकिस्तानने 20 षटकात 3 गडी गमवून 199 धावा केल्या आणि विजयासाठी 200 धावांचं आव्हान दिलं. या सामन्यात साहिबजादा फरहानची शतकी खेळी महत्त्वाची ठरली. हा सामना पाकिस्तानने 102 धावांच्या फरकाने जिंकला.
पाकिस्तानकडून साहिबजादा फरहान आणि सईम आयुब ही जोडी मैदानात आली होती. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी केली. पावरप्लेचं शेवटचं षटकं सुरू असताना पहिल्या चेंडूवर सईम आयुबची विकेट मिळाली. त्यानंतर साहिबजादा फरहानने कर्णधार सलमान आगासोबत मोर्चा सांभाळला. दुसऱ्या विकेटसाठी 42 चेंडूत 67 धावांची खेळी केली. ही जोडी फुटल्यानंतर ख्वाजा नाफाय मैदानात उतरला. पण तो काही खास करू शकला नाही. फक्त 5 धावा करून तंबूत परतला. त्याला बाबर आझमच्या पुढे प्रमोशन देण्यात आलं होतं. पण बाद झाल्यानंतरही बाबर ऐवजी शादाब खानला पुढे पाठवल. शाहिबजादा फरहान आणि शादाब खान यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 81 धावांची खेळी केली.
पाकिस्ताननी विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना नामिबियाचा डाव पत्त्यासारखा कोसळला. एकही फलंदाजी साजेशी कामगिरी करू शकला नाही. एका पाठोपाठ एक धडाधड विकेट पडत गेल्या. लॉरेन स्टीनकॅम्प 23, जॅन फ्रायलिंक 9, जॅन निकोल लॉफ्टी-ईटन 5, गेरहार्ड इरास्मस 7, अलेक्झांडर वोल्शेंक 20, जेजे स्मित 9, रुबेन ट्रम्पेलमन 0, झेन ग्रीन 7 , विलेम मायबर्ग 8, बर्नार्ड शॉल्झ 1, असे बाद झाले. जॅक ब्रासेल नाबाद 1 धावेवर राहिला.
शहर
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
- मुंबई: 'कॉक्रोच जनता पार्टी' आणि अभिजित दिपकेंवर नितेश राणे यांचे गंभीर आरोप; छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याचा दावा करत 'तुकडे-तुकडे गँग'शी जोडले कनेक्शन
- मुंबई: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश! महाराष्ट्र शासनाकडून MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या बदलीचे आदेश जारी
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: धावणाऱ्या परराज्यातील गाड्यांवर आरटीओचा मोठा बडगा; ५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार
- सातारा: यशवंतराव चव्हाण स्मृती परिसरात खाद्यपदार्थांवर बंदी! कराड नगरपालिकेचे मोठे पावले उचलत नियमावली केली लागू
- सातारा: नौसिकांनी अनुभवला शूरांच्या जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा! 'वेस्टर्न नेव्हल कमांड'च्या दुचाकी रॅलीचे साताऱ्यात उत्साहात भव्य स्वागत
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?


























Subscribe to my channel




