बँकिंग क्षेत्रात आपले करिअर करण्याची इच्छा असलेल्या पदवीधर तरुणांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) नोकरीची एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या एसबीआयमध्ये ‘सर्कल बेस्ड ऑफिसर’ (CBO) पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती करण्यात येणार आहे. या अर्जांसाठी १८ फेब्रुवारी ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र उमेदवारांचा वाढता उत्साह आणि तांत्रिक बाबींचा विचार करून बँकेने आता ही मुदत २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे अनेकांसाठी ही करिअरमध्ये मोठी झेप घेण्याची उत्तम संधी मानली जात आहे.
एकूण २२७३ जागांची भरती
या भरती प्रक्रियेद्वारे देशभरातील विविध सर्कल्समध्ये एकूण २२७३ रिक्त पदे भरली जाणार आहेत. यात २०५० नियमित पदे (Regular Vacancies) असून २२३ पदे मागील वर्षांतील शिल्लक (Backlog) आहेत.
विभागांनुसार (Circle-wise) रिक्त पदे
या भरतीमध्ये महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध आहेत. सध्या महाराष्ट्र सर्कल १९४ पदे रिक्त आहेत, त्यांच्यासाठी ही भरती केली जाणार आहे. मुंबई मेट्रो सर्कल (मुंबई आणि गोवा) – १४३ पदे रिक्त आहेत. त्यापाठोपाठ अहमदाबाद (२००), बंगळुरू (३००), भोपाळ (१५०), चंदीगड (२५०), चेन्नई (२००), उत्तर पूर्व (१७५), हैदराबाद (५०), जयपूर (१००), कोलकाता (२००), लखनऊ (५०) आणि नवी दिल्ली (७०) यांसह एकूण १६ सर्कल्समध्ये ही भरती होत आहे.
पात्रतेचे निकष काय आहेत?
- शिक्षण: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduation) उमेदवार अर्ज करू शकतात. वैद्यकीय, अभियांत्रिकी, चार्टर्ड अकाउंटंट (CA) अशा पदवीधारकांनाही या पदासाठी संधी आहे.
- अनुभव: ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत, उमेदवाराला कोणत्याही अनुसूचित व्यावसायिक बँकेत किंवा प्रादेशिक ग्रामीण बँकेत (RRB) अधिकारी म्हणून किमान २ वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- वयोमर्यादा: उमेदवाराचे वय २१ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे (३१ डिसेंबर २०२५ रोजी). सरकारी नियमांनुसार मागासवर्गीय उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
- भाषा: उमेदवार ज्या सर्कलसाठी अर्ज करत आहे, तिथल्या स्थानिक भाषेचे (उदा. महाराष्ट्रासाठी मराठी) ज्ञान असणे अनिवार्य आहे.
अशी असेल निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड चार टप्प्यांत केली जाईल. सुरुवातीला मार्च २०२६ मध्ये ऑनलाईन लेखी परीक्षा (Objective + Descriptive) घेतली जाईल. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची कागदपत्रे तपासली जातील (Screening) आणि त्यानंतर मुलाखत व स्थानिक भाषा चाचणी घेतली जाईल.
अर्ज कसा कराल?
जे कोणी इच्छुक उमेदवार असतील त्यांनी २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर (sbi.bank.in/web/careers) जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे. सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी ७५० रुपये शुल्क असून, अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



