पुणे: वाहनधारकांसाठी आणि पुणेकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. पुणेकरांची आणि पुण्यातील वाहनांची खास ओळख असलेली 'MH-12' ही वाहन नोंदणी क्रमांकाची (Registration Series) मालिका आता संपण्याच्या उंबरठ्यावर आली आहे. सध्या उपलब्ध असलेले नंबर्स वेगाने संपत चालले असून, त्यामुळे आता यापुढे नवीन वाहने खरेदी करणाऱ्या नागरिकांना कोणता नंबर दिला जाणार याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (Pune RTO) मोठा निर्णय घेण्याची तयारी सुरू आहे.
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सध्या दुचाकी वाहनांसाठी 'झेड वाय' (ZY) आणि चारचाकी वाहनांसाठी 'झेड डब्लू' (ZW) ही मालिका सुरू आहे. आरटीओच्या नियमांनुसार 'झेडझेड' (ZZ) ही मालिका संपल्यानंतर दोन इंग्रजी अक्षरांचा पर्याय पूर्णपणे संपणार आहे. यातील दुचाकी गाड्यांची नंबर मालिका अवघ्या काही दिवसांतच पूर्णपणे संपणार असून, चारचाकी गाड्यांची नंबर मालिका देखील पुढील दोन महिन्यांत संपणार आहे. यामुळे आरटीओ विभागासमोर नवीन मालिकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
'झेडवाय' आणि 'झेडडब्ल्यू' ही मालिका संपल्यानंतर पुणे आरटीओला पूर्णपणे नवीन मालिका सुरू करावी लागणार आहे. नवीन नंबरप्लेटच्या रचनेसाठी पुणे आरटीओने सध्या दोन प्रमुख पर्याय समोर ठेवले आहेत. पहिल्या पर्यायानुसार तीन अक्षरांच्या मालिकेचा प्रस्ताव आहे, ज्यामध्ये 'MH-12-AAA 1234' अशा स्वरूपाचे नंबर दिले जाऊ शकतात. परंतु, यामुळे नंबरप्लेटवरील अक्षरे आणि अंकाची लांबी वाढू शकते. परिणामी, रस्त्यांवर असलेल्या हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे आणि ऑटोमॅटिक नंबरप्लेट रेकग्निशन सिस्टीममध्ये (ANPR) लांब नंबर कॅप्चर होण्यात तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करणे कठीण होऊ शकते.
यावर पर्याय म्हणून आरटीओने दुसरा 'अल्फान्यूमेरिक' मालिकेचा पर्याय ठेवला आहे, ज्यामध्ये अंक आणि अक्षरांचे अचूक मिश्रण असेल. याबाबतचा प्रस्ताव आरटीओने राज्याच्या परिवहन विभागाकडे पाठवला आहे. मात्र, यात अक्षरासोबत जोडलेला अंक हा पुढील मुख्य क्रमांकाचा भाग वाटू शकतो, ज्यामुळे सरकारी 'वाहन' प्रणाली आणि नंबरप्लेट निर्मिती यंत्रणेच्या डिजिटल डेटाबेसमध्ये मोठे तांत्रिक बदल करावे लागतील. या सर्व तांत्रिक बाबींवर सध्या पुणे आरटीओ विभाग गांभीर्याने विचार करत असून, वाहन नोंदणीच्या नवीन पद्धतीबाबत लवकरच अधिकृत आणि मोठा बदल जाहीर केला जाण्याची दाट शक्यता आहे.
शहर
- पुणे: दौंडमध्ये भरदिवसा धाडसी चोरी! दुचाकीवरून १ लाख ४० हजारांचे सिगारेटचे बॉक्स लंपास, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
- पुणे: १५ ऑक्टोबरपूर्वी किंवा त्यापूर्वीही सुरू करता येणार ऊस गाळप हंगाम; साखर आयुक्त कार्यालयाचा मोठा निर्णय
- मुंबई: दिंडोशीत माकडांचा उच्छाद! १९ व्या मजल्यवर पोहोचले माकड, वृंदावन सोसायटीचे रहिवासी त्रस्त; वनविभागाकडे कारवाईची मागणी
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
महाराष्ट्र
- पुणे: दौंडमध्ये भरदिवसा धाडसी चोरी! दुचाकीवरून १ लाख ४० हजारांचे सिगारेटचे बॉक्स लंपास, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
- वर्धा: महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात निलंबित विद्यार्थ्यांसाठी तीव्र आंदोलन; प्रशासनासोबतची चर्चा निष्फळ
- पुणे: लक्ष्मी रोडवरील बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयाला भीषण आग; ७ अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल, मोठी दुर्घटना टळली
- कोल्हापुर: बिबट्याची दहशत! फुलेवाडी-लक्षतीर्थ मार्गावर उसाच्या शेतात शिरला बिबट्या, थर्मल ड्रोनच्या साहाय्याने शोधमोहीम सुरू
गुन्हा
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- तमिळनाडू: थलापती विजय सरकारची धमाकेदार योजना; बाळ जन्माला येताच सरकारी रुग्णालयात मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!



























Subscribe to my channel



