Pavana Dam : पिंपरी चिंचवड, मावळवर पाणी टंचाईचे सावट; पवना धरणात केवळ ३७ टक्के पाणीसाठा

Maval : राज्यात वाढत असलेल्या पाणीटंचाईचे सावट आणखीन गडद होत चालले आहे. धरणातील पाणी साठा कमी होत चालल्याने हि समस्या निर्माण झाली असून पिंपरी चिंचवड आणि मावळला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात देखील आता अवघा ३७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. यामुळे आगामी काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

मावळ तालुक्यातील पवना धरण हे सर्वात मोठे धरण असून त्यातून पिंपरी चिंचवड, देहूरोड, तळेगाव व मावळ तालुक्यातील औद्योगिक वसाहती ग्रामपंचायतच्या पाणी योजना व शेतीसाठी पाण्याचा वापर केला जातो. पावसाळ्यात बऱ्यापैकी पाणीसाठा धरणात झाला होता. मात्र उन्हाची तीव्रता अधिक असल्याने धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणीसाठ्यात घट होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. त्यानुसार पवना धरणातील पाणीसाठा देखील कमी झाला आहे. 

Gujarat : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गुजरातमध्ये मोठी कारवाई; पोलिसांनी हजारो बेकायदेशीर परदेशी नागरिकांना घेतलं ताब्यात!

मावळात यावर्षी कडक उन्हाळा जाणवत असून धरणातील पाणी साठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. पवना धरणात सध्या ३७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. अद्याप मे महिना बाकी असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. पावसाळा सुरू होऊन जलसाठा वाढेपर्यंत पाणी जपून वापरावे; असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply