
Pune : अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी विश्वाचे आकर्षण वाढू लागले आहे. खून, खुनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड यांसारख्या गंभीर गुन्ह्यात किशोरवयीनांचा वाढता सहभाग ही चिंतेची बाब ठरत आहे. अल्पवयीन असल्याने ही मुले बालसुधारगृहातून महिना-दोन महिन्यांत बाहेर येतात आणि गुन्हेगारी क्षेत्रात सहजपणे दाखल होतात. सामाजिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही बाब घातक ठरत आहे. या वाढत्या बालगुन्हेगारीला आळा कसा घालायचा, हा प्रश्न पोलिसांपुढे दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत आहे.
पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत संमिश्र जीवनमान आहे. भोसरी, पिंपरी, निगडी, चिंचवड, चिखली, चाकण या भागांत लहान-मोठे कारखाने आहेत. शहरात राज्याबरोबरच परराज्यांतूनही रोजी-रोटीसाठी दाखल झालेला सर्वसामान्य कामगार वर्ग येथे मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. शहरात जवळपास ७५ झोपडपट्ट्या आहेत. तर, तळवडे, वाकड, हिंजवडी भागात आयटी कंपन्या आहेत. या भागांत उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायट्या आहेत. मोठमोठे टॉवर उभे राहिले आहेत.
झोपडपट्टीसारख्या ठिकाणी मोलमजुरीसाठी सकाळीच आई-वडील घराबाहेर पडतात. त्यामुळे त्यांचे मुलांकडे दुर्लक्ष होते. काही मुले शिक्षणापासून वंचित राहतात. तर, काही शिक्षण अर्धवट सोडतात. मुले लहान वयातच वाममार्गाला लागणे, हा याचा परिणाम. उच्चभ्रू सोसायट्यांमध्येही आई-वडील दोघेही नोकरी करतात. मात्र, त्यांची मुले एक तर पाळणाघरात असतात किंवा त्यांच्यासाठी खास काळजी घेणारा (केअर टेकर) नियुक्त केलेला असतो. मात्र, अती लाडामुळे या मुलांमध्ये त्वरित राग येणे आणि हिंसक वृत्ती वाढीस लागल्याचे निरीक्षण आहे. याच्या परिणामीही त्यांच्या हातून गुन्हे घडत असल्याचे दिसते.
|
Pimpri : पिंपरीतील तीन रुग्णालयांमध्ये बॉम्ब ठेवल्याचा ई- मेल |
भोसरीतील शांतीनगर येथे धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून सहा अल्पवयीन मुलांनी मिळून तरुण उद्योजकाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारून त्याचा खून केला. पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. त्यातही अल्पवयीनांचा मोठा सहभाग आहे. मध्यंतरी चिंचवड-लिंकरोड येथील पत्राशेड परिसरात दोन अल्पवयीन मुलांसह चौघेजण मद्यपान करत होते. त्यांच्यात वाद झाल्याने त्यांनी राग काढण्यासाठी थेट परिसरातील पाच दुचाकी आणि दोन मोटारींवर दगड घालून त्यांची तोडफोड केली. निगडीत वाढदिवस साजरा झाल्यानंतर काही मोठे कारण नसताना १८ वाहनांची तोडफोड करण्यात आली.
तोडफोडीच्या अशा बहुतांश घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. गुन्हेगारी विश्वाचे आकर्षण आणि परिसरात स्वतःची दहशत निर्माण करणे, हा त्यांचा यामागे उद्देश असल्याचे समोर येत आहे. खून, खुनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड अशा अनेक प्रकरणांमध्ये अल्पवयीनांचा सहभाग दिसून येतो. अशा गुन्ह्यांपैकी ९९ टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश येते. मात्र, यातील अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग ही चिंतेची बाब आहे. अल्पवयीनांचा गुन्ह्यातील सहभाग रोखण्यासाठी पोलिसांकडूनही मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु, या वाढत्या बालगुन्हेगारीला आळा कसा घालायचा, हा प्रश्न पोलिसांपुढे दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत आहे.
पोलिसांकडून समुपदेशन
अल्पवयीन गुन्हेगारांमध्ये सध्या पहिल्यांदाच गुन्हा केलेल्यांचा समावेश जास्त आहे. रागाच्या भरात किंवा इतर कारणांमुळे त्यांच्याकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडले आहेत. त्यांच्याकडून पुन्हा गुन्हा घडू नये यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. अल्पवयीन मुलांचा विविध गुन्ह्यांमध्ये समावेश वाढत असल्याने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय स्तरावर त्यासाठी स्वतंत्र पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. गुन्हेगारी क्षेत्राकडे वळणाऱ्या या मुलांचे समुपदेशन केले जाते. तसेच, शिक्षणासह रोजगार उपलब्ध होण्यासाठी व्यवसाय प्रशिक्षणही देण्यात येत आहे. करिअरबाबत त्यांना मार्गदर्शनही केले जात आहे.
शहर
- पुणे: कोर्टाबाहेर मंदार किवळेला संपवणाऱ्या ७ आरोपींची नावे समोर; अक्षय चव्हाण मास्टरमाईंड, रात्रीपासूनच आंबेगावात दबा धरून होते!
- पुणे: विमानतळावर पिकअप-ड्रॉप लेनमध्ये १५ मिनिटांपेक्षा जास्त थांबाल तर ५०० रुपये दंड; १ डिसेंबरपासून नवा नियम लागू!
- पुणे: राक्षेवाडीत काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; एसटी बसला ओव्हरटेक करताना एमपीएससी विद्यार्थिनीचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद!
- पुणे: शिवाजीनगर कोर्टाबाहेर १२० सेकंदांत थरार; पहिला प्लॅन फसल्यानंतर कोयत्याने सपासप वार, मंदार किवळेवर प्राणघातक हल्ला!
महाराष्ट्र
- कोल्हापूर: दुष्काळामुळे वारणेचे कृषी प्रदर्शन आणि कुस्ती मैदान रद्द; पशुधन वाचवण्यासाठी चारा योजना व पीएमआर प्रकल्पाची घोषणा!
- पुणे: कोर्टाबाहेर मंदार किवळेला संपवणाऱ्या ७ आरोपींची नावे समोर; अक्षय चव्हाण मास्टरमाईंड, रात्रीपासूनच आंबेगावात दबा धरून होते!
- पुणे: विमानतळावर पिकअप-ड्रॉप लेनमध्ये १५ मिनिटांपेक्षा जास्त थांबाल तर ५०० रुपये दंड; १ डिसेंबरपासून नवा नियम लागू!
- कोल्हापुर: परप्रांतीय वॉचमनकडून १३ वर्षीय शाळकरी मुलीशी अश्लील चाळे; राजारामपुरी पोलिसांकडून संशयितास अटक!
गुन्हा
- पुणे: शिवाजीनगर कोर्टाबाहेर १२० सेकंदांत थरार; पहिला प्लॅन फसल्यानंतर कोयत्याने सपासप वार, मंदार किवळेवर प्राणघातक हल्ला!
- जळगाव: पाटील कुटुंबातील ६ जणांना कालव्यात फेकलं; तिघांचा मृत्यू, दोघे बेपत्ता आणि १३ वर्षीय मुलाने सांगितला थरार!
- ठाणे: शोरमा खाल्ल्याने १७ जणांना विषबाधा; भिवंडी महापालिकेकडून संबंधित दुकान सील व टपरी जप्त, पोलिसांत गुन्हा दाखल!
- पुणे: प्रेमविवाहाला कुटुंबांची पसंती, पण संशयाने घात केला! हिंजवडीत आयटी अभियंता तरुणीचा प्रियकराकडून मृत्यू; आरोपी ताब्यात
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!


























Subscribe to my channel




