
पुणे : आपल्याकडे पॅन कार्ड असेल तर, हे पॅन कार्ड आपल्या आधार क्रमांकाशी जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी शेवटचे तीन दिवस उरले आहेत. या मुदतीत पॅन कार्ड हे आधार क्रमांकाशी जोडण्यात अपयशी ठरलेल्या नागरिकांचे पॅन कार्ड अवैध (रद्द) ठरणार आहे.
यामुळे पॅन कार्डच्या आधारे मिळालेल्या सर्व सेवा जसे बॅंक खाते बंद पडण्यासह अन्य सर्व खंडित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. आपापल्या या सेवा पुर्ववत कायम ठेवण्यासाठी नागरिकांना येत्या ३१ मार्चपूर्वी आपापले पॅन कार्ड हे आधार क्रमांकाशी जोडावे (लिंक) लागणार आहे. यापुढे कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नसल्याचे प्राप्तीकर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पॅन कार्ड धारा क्रमांकाशी जोडण्यासाठी आता प्रत्येकी एक हजार रुपयांचे शुल्कसुद्धा मोजावे लागणार आहे. याबाबतची अंतिम मुदत, त्यासाठी आकारले जाणारे शुल्क आणि पॅन कार्ड हे आधार क्रमांकाशी कसे जोडावे, याबाबतची सविस्तर माहिती प्राप्तीकर विभागाच्या (इन्कम टॅक्स) www.incometax.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) याबाबतचा निर्णय २०१७ मध्येच घेतला होता. या निर्णयानुसार हे कार्ड आधार क्रमांकाशी जोडण्यासाठी पहिल्यांदा ३१ मार्च २०२० ही अंतिम मुदत देण्यात आली होती. परंतु देशात मार्च २०२० पासून सुरु झालेल्या कोरोना संसर्गामुळे यासाठी दोन वर्षांची मुदतवाढ देऊन, याची अंतिम तारीख ही ३० मार्च २०२२ अशी निश्चित करण्यात आली होती.
या तारखेपर्यंत पॅन हे आधार क्रमांकाशी विनाशुल्क (मोफत) जोडले जात असे. मात्र ही दुसरी मुदतवाढ संपल्यानंतर तिसऱ्यांदा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु या तिसऱ्या मुदतीत प्रत्येकी ५०० रुपये शुल्क आकारले जात असे. ही मुदत ३० जून २०२२ रोजी संपली आहे. त्यानंतर १ जूलै २०२२ पासून ३१ मार्च २०२३ पर्यंत शेवटची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या शेवटच्या मुदतवाढीत मात्र प्रत्येकी १ हजार रुपयांचे शुल्क आकारले जात आहे.
ऐंशी वर्षाच्या नागरिकांना सूट
दरम्यान, किमान ८० वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे पॅन कार्ड हे आधार क्रमांकाशी जोडण्याची आवश्यकता नाही. या ज्येष्ठ नागरिकांना यामधून सूट देण्यात आलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांबरोबरच अनिवासी भारतीय, भारतीय नागरिक नसलेले आणि आसाम, मेघालय व जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना यामधून सूट देण्यात आलेली आहे.
पॅन कार्ड कसे लिंक करावे
आपले पॅन कार्ड आधार क्रमांकाशी जोडण्यासाठी पहिल्यांदा प्राप्तीकर विभागाच्या (इन्कम टॅक्स) www.incometax.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. हे संकेतस्थळ सुरु होताच, मुख्य पानावरच (होम पेज) ‘लिंक पॅन विथ आधार’ असे इंग्रजी भाषेत लिहिलेला पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करा.
हा पर्याय ओपन झाल्यानंतर ई-पे टॅक्स या दुसऱ्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर या पर्यायाच्या माध्यमातून एक हजार रुपये शुल्क भरा. शुल्क भरल्याचे कन्फर्म झाल्यानंतर आपले पॅन कार्ड हे आधार क्रमांकाशी जोडण्याचा पर्याय उपलब्ध होईल. या पर्यायावर जाऊन हे दोन्ही क्रमांक जोडा. ते यशस्वीपणे जोडले गेल्यानंतर आपल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी (वन टाइम पासवर्ड) येईल. हा ओटीपी आवश्यक त्या रकान्यात भरा. त्यानंतर आपले पॅन आधार क्रमांकाशी जोडले जाईल. आपले पॅन यशस्वीपणे जोडल्याचा मेसेज आपल्या मोबाईल क्रमांकावर येईल.
जोडणीसाठी आवश्यक बाबी
- वैध पॅन कार्ड
- वैध आधार कार्ड
- मोबाईल नंबर
- वैध आधार क्रमांक
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने पॅन कार्ड आधार क्रमांकाशी लिंक करण्यासाठी आतापर्यंत चार वेळा मुदतवाढ दिलेली आहे. आता शेवटची मुदतवाढ असून, ही मुदत येत्या ३१ मार्च रोजी संपत आहे. या मुदतीत एक हजार शुल्क भरून पॅन कार्ड हे आधार क्रमांकाशी जोडणे अनिवार्य केले आहे. या मुदतीत ते न जोडल्यास, येत्या १ एप्रिलपासून पॅन कार्ड रद्द होणार आहे. पर्यायाने या कार्डच्या आधारे उघडण्यात आलेले बॅंक खात्यातील व्यवहार ठप्प होण्याचा धोका आहे.
- अण्णासाहेब गिरीगोसावी,कर सल्लागार, येवलेवाडी
शहर
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा अमरावतीत बोलबाला; संत्रा-आंब्याची अडीच हजार हेक्टरवर लागवड!
महाराष्ट्र
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा अमरावतीत बोलबाला; संत्रा-आंब्याची अडीच हजार हेक्टरवर लागवड!
- वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आषाढी वारीसाठी पंढरपूर मार्गावर १६ जादा एसटी बसफेऱ्या; वारीचा प्रवास होणार सुकर!
गुन्हा
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
- बुलढाणा: 'क्रांतीज्योती' योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी लाच मागणारा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!


























Subscribe to my channel




