
Chakan : पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीत आज सकाळी एका भीषण घटनेने खळबळ उडाली होती. महिंद्रा कंपनीसमोर प्रवाशांनी भरलेल्या PMPML च्या धावत्या इलेक्ट्रिक बसने अचानक पेट घेतला. बसमध्ये साधारण 50 कामगार प्रवास करत होते. सुदैवाने, चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवून प्रवाशांना तत्काळ खाली उतरवल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र, ही घटना सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज बांधला जात आहे. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते आणि काही वेळातच लाखो रुपयांची ही बस जागेवर जळून खाक झाली.
चिंतेची बाब आणि वाढत्या घटना
दरम्यान, अशा घटनांची ही काही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षभरात पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात PMPML च्या बसेसना आग लागण्याच्या किमान १० ते १२ घटना समोर आल्या आहेत. कधी इंजिन गरम होणे, तर कधी बॅटरीमधील बिघाड, ही कारणे दिली जातात. पण प्रश्न उरतोच की, 50 प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या तांत्रिक चुकांना जबाबदार कोण? प्रशासनाचा देखभाल-दुरुस्तीचा अभाव की कंत्राटदारांचा निष्काळजीपणा?
एकीकडे आपण 'ग्रीन मोबिलिटी'च्या गप्पा मारतो, पण त्याच इलेक्ट्रिक बसेस जर 'फिरता मृत्यू' ठरणार असतील, तर प्रवाशांनी कोणावर विश्वास ठेवायचा? दररोज लाखो पुणेकर या बसने प्रवास करतात. तांत्रिक तपासणीचा अभाव हे या घटनांमागचे मुख्य कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
काय काळजी घेणे आवश्यक आहे?
दरम्यान, प्रत्येक फेरीनंतर बसच्या इलेक्ट्रिकल वायरिंगची तपासणी होणे गरजेचे असते, बसमध्ये अग्निशमन उपकरणे सुस्थितीत असावीत आणि चालकांना त्याच्या वापराचे प्रशिक्षण दिलेले हवे असणे बंधनकारक असते. धूर निघताच अलार्म वाजणारी यंत्रणा बसमध्ये असणे अनिवार्य आहे, असं संबंधित घटना टाळण्यासाठी गरजेचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
दरम्यान, प्रशासनाने या घटनांची केवळ कागदोपत्री चौकशी न करता दोषींवर कडक कारवाई करणे अपेक्षित आहे, अन्यथा प्रवाशांचा प्रवास हा कधीही अंतिम प्रवास ठरु शकतो.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




