पुणे: चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुळा-मुठा आणि भीमा नदी दुथडी भरून वाहत आहेत. नदीपात्रातील पाणी झपाट्याने वाढल्याने दौंड तालुक्यातील संगम-वाळकी पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला असून वाळकी आणि देलवडी गावांतील संपर्क तुटला आहे. प्रशासनाने परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत रेड अलर्ट जारी केला आहे.
सलग पडणाऱ्या पावसामुळे घाटमाथा आणि धरण परिसरातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे मुळा-मुठा आणि भीमा नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. सोमवारी सकाळपासूनच संगम-वाळकी पुलावरून पाणी वाहू लागले आणि काही वेळातच पूल पूर्णपणे जलमय झाला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली.
पूरस्थितीमुळे दौंड तालुक्यातील अनेक कोल्हापूर पद्धतीचे बंधारेही पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठच्या शेतकऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या शेतातील विद्युत पंप आणि अन्य साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. पावसामुळे शेतीची कामे, वीटभट्ट्या आणि गुऱ्हाळ व्यवसायही काही ठिकाणी ठप्प झाले असून शेतमजूर आणि कामगारांना घरातच राहावे लागत आहे.
पूरस्थिती पाहण्यासाठी नदीकाठच्या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचे दिसून आले. विशेषतः पारगाव परिसरातील पुलावर भीमा नदीचे रौद्ररूप पाहण्यासाठी अनेक जण जमा झाले होते. मात्र प्रशासनाने नागरिकांना नदीकाठापासून दूर राहण्याचे आणि पूल किंवा बंधाऱ्यांवर जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवला असून प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून नागरिकांनी केवळ अधिकृत सूचनांवर विश्वास ठेवावा आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहर
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
- मुंबई: आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न; अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याच्या नोटीसवर काँग्रेस नेते नाना पटोले यांचा केंद्र सरकारवर घणाघात!
- पुणे: पद हवंय, आधी कामाचं रिपोर्ट कार्ड दाखवा ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली पुण्यातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची कानउघडणी!
महाराष्ट्र
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
- रत्नागिरी: कोंबड्यांच्या खोलीत रात्रभर राहिला बिबट्या; सर्व कोंबड्या फस्त करत दरवाजा उघडणाऱ्या महिलेवर केला हल्ला!
- गोवा: कुल-मुंडकार प्रकरणांबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; १९ डिसेंबरपर्यंत सर्व प्रकरणांची होणार सोडवणूक!
गुन्हा
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर



























Subscribe to my channel




