बीजिंगमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यातीलशिखर परिषदेत आयात कर, तैवान किंवा इराणयुद्धासारख्या मुद्द्यांवर कोणतीही निर्णायक चर्चा झालीनसली, तरी संयमित आणि सौहार्दपूर्ण पद्धतीने ही बैठकपार पडली. त्यातून एका नव्या व्यावहारिक दृष्टिकोनाचेसंकेत मिळाले. या बैठकीने स्पष्ट केले की, दोन्हीमहासत्तांना आता एकमेकांवरील खोल आर्थिकअवलंबित्व मान्य करावे लागेल. बीजिंगमधील चर्चेत अमेरिकन व चिनी राष्ट्रपतीद्विपक्षीय संबंधांकडे केवळ भूराजकीय स्पर्धेच्यादृष्टिकोनातून पाहत नव्हते, हे स्पष्ट दिसून आले. अमेरिकेने चीनला एक बलाढ्य आर्थिक प्रतिस्पर्धीम्हणून स्वीकारणे म्हणजे स्वतःचा प्रभाव कमी करणेनव्हे, तर वास्तवाची जाणीव होय. चीनच्या उदयावर अमेरिकेत अनेक वर्षे एक ठरावीक पद्धतीने चर्चा होत आली आहे. सुरुवातीला त्याचा इन्कार केला गेला, नंतर नाराजी व्यक्त करण्यात आली आणि अखेरीस तेवास्तव स्वीकारावे लागले. दुहेरी अंकातील आर्थिक वाढीच्या काळात अनेक अमेरिकन विश्लेषकांनी चीनचे अधिकृत आकडे अविश्वसनीय किंवा अतिशयोक्त असल्याचे सांगतत्यांना नाकारले होते. मात्र, चीनच्या आर्थिक प्रगतीकडे दुर्लक्ष करणे अशक्य होत गेल्यानंतर त्याच्या यशाचे श्रेयऔद्योगिक धोरण, बौद्धिक संपदेची चोरी आणिचलनातील हस्तक्षेप यांसारख्या कथित अन्यायकारकपद्धतींना दिले जाऊ लागले. आता मात्र हे नरेटिव्हटिकवणे कठीण झाले आहे. कारण चीनने अनेक रणनीतिक उद्योगांमध्ये तांत्रिकआघाडी मिळवली आहे. विशेषतः चिनी ईव्हीउत्पादकांनी कमी किमतीच्या मॉडेलपासून प्रगत प्रीमियमब्रँडपर्यंत विविध क्षेत्रांत जागतिक स्तरावरील प्रतिस्पर्धीम्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.औषधनिर्मिती क्षेत्रातही चिनी कंपन्या नावीन्यपूर्ण बनल्याआहेत. सेमीकंडक्टर क्षेत्रात चीनने प्रगत चिप्सउत्पादनात महत्त्वपूर्ण प्रगती केली असली, तरी तो अद्यापटीएसएमसीपेक्षा मागे आहे. अशा परिस्थितीत चीनच्यातांत्रिक प्रगतीला नाकारण्याऐवजी किंवा त्यात अडथळेनिर्माण करण्याऐवजी अमेरिकेने हे मान्य केले पाहिजेकी, चिनी स्पर्धा आता कायम राहणार आहे. त्यामुळेआर्थिक सहअस्तित्व आणि मर्यादित सहकार्य यासाठीठोस चौकट उभी करणे आवश्यक आहे. ट्रम्पयांच्यासोबत बीजिंगला गेलेल्या प्रमुख अमेरिकन सीईओआणि उद्योग नेत्यांनीही पूर्णपणे वेगळे होणे वास्तववादीकिंवा योग्य नसल्याचे स्पष्ट केले. त्याऐवजी निवडक क्षेत्रांमध्ये परस्परावलंबित्व कायमठेवणे हा अधिक व्यवहार्य मार्ग असल्याचे त्यांनीसांगितले. शी जिनपिंग यांनी द्विपक्षीय संबंध स्पष्टकरण्यासाठी ‘थ्युसीडिड्स ट्रॅप’चा उल्लेख केला.राजकीय शास्त्रज्ञ ग्रॅहम एलिसन यांनी उदयोन्मुख शक्तीआणि प्रस्थापित महासत्ता यांच्यात निर्माण होणाऱ्यासंघर्षाच्या धोक्यासाठी हा शब्दप्रयोग केला होता. मात्र, अमेरिकेसमोर अनेक आव्हाने असली, तरी तिलाक्षीण होत चाललेली महासत्ता म्हणणे अद्याप घाईचेठरेल. आजही अमेरिका नवकल्पना आणि उद्योजकतेचेजागतिक केंद्र आहे. संगणक, इंटरनेट, स्मार्टफोन आणिएआयसारख्या गेल्या शतकातील अनेक परिवर्तनकारीतंत्रज्ञानांची निर्मिती अमेरिकेत झाली आहे. वैज्ञानिकनेतृत्व, भांडवली बाजार, उद्योजकीय संस्कृती आणिसंस्थात्मक लवचिकता यांचा संगम अमेरिकेसारखाअन्य कोणत्याही देशाकडे नाही. अब्जाधीश गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी एकदा म्हटलेहोते की, १७७६ पासून अमेरिकेविरुद्ध पैज लावूनकोणीही यशस्वी झालेले नाही. त्यामुळे जगाला आता यादोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये अधिकसहकार्याची गरज भासणार आहे. (@प्रोजेक्ट सिंडिकेट) आज अमेरिका आणि चीन या दोन्हीदेशांसमोर जवळपास समान आव्हानेआहेत : वेगाने होणारे तांत्रिक बदल,एआय, आर्थिक अस्थिरता, सामाजिकविषमता आणि हवामान बदल. यासमस्यांवर उपायासाठी दोन्ही देशांनीएकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या; लोहगाव पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात गुन्हा दाखल
- नवी मुंबई: सीबीडी बेलापूरच्या पारसिक हिलवरून थेट रेल्वे रुळावर कोसळली कार; १७ वर्षीय विद्यार्थी थोडक्यात बचावला, लोकल सेवा विस्कळीत
- पुणे: मंचर-कलंब परिसरात शेतातील कृषी पंप सुरू करताना विजेचा धक्का लागून महिलेचा जागीच मृत्यू
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
महाराष्ट्र
- पुणे: पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या; लोहगाव पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात गुन्हा दाखल
- नवी मुंबई: सीबीडी बेलापूरच्या पारसिक हिलवरून थेट रेल्वे रुळावर कोसळली कार; १७ वर्षीय विद्यार्थी थोडक्यात बचावला, लोकल सेवा विस्कळीत
- पुणे: मंचर-कलंब परिसरात शेतातील कृषी पंप सुरू करताना विजेचा धक्का लागून महिलेचा जागीच मृत्यू
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
गुन्हा
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
- पुणे: जावयाचा आई-वडिलांना कॉल अन् काही क्षणांतच पुण्यात नामांकित आयटी कंपनीतील वैष्णवीचा धक्कादायक मृत्यू; हुंड्यासाठी छळाचा गंभीर आरोप
- पुणे : ज्येष्ठ डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण अन् खंडणी, 'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेवर पुण्यात गुन्हा दाखल!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

१०७ वर्षे जुन्या गणेशोत्सव मंडळात १६ फूट बाप्पांवर पहिल्यांदाच 3D मॅपिंग!
कारखेल खुर्दच्या गणपती विसर्जनात चिमुकल्यांनी साकारले महापुरुष-संत! 🙏✨
वर्दीची दुसरी बाजू! पोलिसांनी गणेश मंडळाच्या गाड्याला रेटण्यासाठी केली मदत!
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!























Subscribe to my channel




