
पुणे : तब्बल 12 हेक्टर परिसरात केलेले लाखो घनमीटर कचऱ्याचे केलेले क्यापिंग, त्यावरच उभारलेलेले हिरवेगार "अमृतवन', खाणीवरील कॉंक्रीटीकरण, साठलेल्या कचऱ्यावर केली जाणारी प्रक्रिया (बायोमायनींग), त्याद्वारे खतनिर्मिती, मिथेन निर्मिती एवढेच काय, काही प्रमाणात होणारी वीज निर्मिती अशा टप्प्याटप्प्याने उरुळी देवाची - फुरसुंगी कचरा डेपो प्रकल्प आता पर्यावरण पुरक होऊ लागला आहे.
दुर्गंधीमुक्त, देशी वृक्षांच्या हिरवाईने बहारलेला हा परिसर विद्यार्थी, अभ्यासकांसाठी "वेस्ट मॅनेजमेंट टुरीझम' करण्याच्या दिशेने महत्वपुर्ण पाऊल टाकत असल्याचे चित्र आहे. महापालिकेच्यावतीने उरुळी देवाची - फुरसुंगी कचरा डेपो येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख आशा राऊत, कार्यकारी अभियंता सुधीर चव्हाण, उपअभियंता राजेंद्र तिडके, अभियंता संकेत जाधव यावेळी उपस्थित होते. खेमनार यांच्यासह राऊत, चव्हाण व तिडके व जाधव यांनी प्रकल्पातील विविध कामांची व टप्प्यांची माहिती दिली.
महापालिकेच्या हद्दीतील निर्माण होणाऱ्या कचरा उघड्यावर न टाकता त्यावर प्रक्रिया करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या पार्श्वभुमीवर महापालिकेकडून शहरात गोळा होणाऱ्या 2200 टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी विविध ठिकाणी प्रकल्प उभारण्यात आले आहे. दरम्यान, वेळोवेळी नागरीकांचे होणारे आंदोलन,
आगीच्या घटनांमुळे देवाची उरुळी - फुरसुंगी कचरा डेपो येथे उघड्यावर कचरा टाकण्याचे महापालिकेकडून बंद करण्यात आले. तसेच मागील दोन वर्षांपासून भुमी ग्रीन या संस्थेकडून साठलेल्या कचऱ्याचे बायोमायनींग करुन 21 एकर जागा रिकामी करण्यात आली. डिसेंबर महिन्यापर्यंत 20 लाख मेट्रीक टन कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया पुर्ण करण्यात येणार असल्याचे डॉ.खेमनार यांनी सांगितले.
माती, पाणी, वायु प्रदूषण मुक्तीकडे वाटचाल !
उरुळी देवाची - फुरसुंगी कचरा डेपो येथील कचऱ्यामुळे होणारे माती व पाणी दुषीत होण्यापासून रोखण्यासाठी कचरा डेपोच्या जागेत शास्त्रीय भु-भराव (एसएलएफ) टाकण्यात आला. कचऱ्यातील रसायन माती, पाण्यात मिसळू नये, यासाठी प्लॅस्टिकचा वापर करुन एसएलएफ तयार करण्यात आले. त्यावर एकीकडे वाहिन्यांद्वारे रसायन एका ठिकाणी जमा होऊन त्यापासून होणारी मिथेन गॅस हवेत नष्ट केला जात आहे.
दुसरीकडे त्यावर उभारलेल्या हलक्या झाडांमुळे हा परिसर हिरवागार दिसू लागला. त्याचबरोबर प्रकल्पाच्या ठिकाणी साठलेल्या कचऱ्यातुन (बायोमायनींग) विघटनशील व अविघटनशील कचऱ्याचे वर्गीकरण करुन त्यातील विघटनशील कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मितीवर भर दिला जात आहे. तर प्लॅस्टिकसारख्या अविघटनशील कचरा साठवून तो सिमेंट कारखान्यांना इंधन म्हणून पुरविला जातो.
परिणामी विघटनशील व अविघटनशील कचऱ्यावर प्रक्रिया करणे सोपे होते. पहिल्या टप्प्यात 1 हजार मेट्रीक टन क्षमतेने बायोमायनींग करण्यात आली आहे. तर तीन वर्षात 11.76 लक्ष मीटर टन कचऱ्यावर बायोमायनींग करुन 21 एकर जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या टप्प्यांमुळे परिसरातील माती, पाण्याचे प्रदूषण थांबले, याबरोबरच डेपोला आग लागण्याच्या घटना कमी होऊन हवेतील प्रदूषणही कमी झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
कचरा डेपोच्या ठिकाणची वैशिष्ट्ये
- 200 मेट्रीक टन मिश्र कचऱ्यावर प्रक्रिया
- कचऱ्यापासून सेंद्रीय खत निर्मितीला प्राधान्य
- शेतकऱ्यांना नाममात्र दरात खताची विक्री
- सौर उर्जा प्रकल्पाद्वारे 100 किलो वॅट वीज निर्मिती, डेपोच्या परिसरात विजेचा वापर
- "अमृतवन' अंतर्गत देशी प्रजातीची तब्बल 16 हजार झाडांची लागवड
- 15 ते 20 फुटापर्यंत झाडांची वाढ
शहर
- नेपाळ-भारत राजनैतिक चर्चा: परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल दिल्ली दौऱ्यावर; दोन्ही देशांमधील संबंधांना नवी दिशा देण्यावर भर.
- पुणे: न्यायालयाची प्रतिष्ठा आणि शिस्त जपण्यासाठी 'विधि आणि न्याय कट्टा'; पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात अभिनव उपक्रम!
- नागपुर: माकडांचा उच्छाद! 'ऑरेंज सिटी पार्क'मध्ये ५ दिवसांत ६ हल्ले; महिला आणि फुटबॉलपटू जखमी.
- पुण्यात पाळीव कुत्र्याचा दहशत; १०-१२ जणांना चावा घेतल्याने मालकावर गुन्हा दाखल, नागरिकांकडून कडक नियमांची मागणी.
महाराष्ट्र
- नेपाळ-भारत राजनैतिक चर्चा: परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल दिल्ली दौऱ्यावर; दोन्ही देशांमधील संबंधांना नवी दिशा देण्यावर भर.
- पुणे: न्यायालयाची प्रतिष्ठा आणि शिस्त जपण्यासाठी 'विधि आणि न्याय कट्टा'; पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात अभिनव उपक्रम!
- नागपुर: माकडांचा उच्छाद! 'ऑरेंज सिटी पार्क'मध्ये ५ दिवसांत ६ हल्ले; महिला आणि फुटबॉलपटू जखमी.
- पुण्यात पाळीव कुत्र्याचा दहशत; १०-१२ जणांना चावा घेतल्याने मालकावर गुन्हा दाखल, नागरिकांकडून कडक नियमांची मागणी.
गुन्हा
- मध्य प्रदेश: एकतर्फी प्रेमातून तरुणाचा अल्पवयीन तरुणीवर कुऱ्हाडीने हल्ला; छताला लटकवून दिला फास.
- कल्याणमध्ये गोळीबार; व्हॉट्सअॅप स्टेटसच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, खडकपाडा पोलिसांकडून दोघांना अटक.
- लातूरच्या मुदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात संतापजनक प्रकार; रुग्णांच्या जीवाशी खेळ, मोठ्या प्रमाणात मुदत संपलेली औषधे सापडली.
- चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलवर सायबर हल्ला; रुग्णांचा डेटा हॅक, हॅकर्सची बिटकॉईनमध्ये खंडणीची मागणी.
राजकीय
- महाराष्ट्राची मोठी भरारी! मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ४,०८० कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार.
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
- भाजपला रामराम! के. अण्णामलाई यांची नवी राजकीय 'चळवळ'; आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली!
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ५ वाजताची डेडलाईन! अभिजीत दिपकेच्या 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला सायंकाळी ५ पर्यंतच परवानगी; दिल्ली पोलिसांचे कडक नियम लागू!
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!

























Subscribe to my channel



