पुणे : कोथरूडमधील सोसायट्यांना आमदार निधीतून मदत ; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

पुणे : कोथरूडमधील सोसायट्यांना सौर ऊर्जा यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे आणि घनकचरा प्रक्रिया उपक्रमांसाठी आमदार निधीतून मदत करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे आवाहनही केले.

कोथरूड मतदारसंघातील एरंडवणे भागातील विविध सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या संवादावेळी पाटील बोलत होते. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डाॅ. कुणाल खेमनार, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, जयंत भावे यावेळी उपस्थित होते. बैठकीत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रामुख्याने महापालिकेच्या अखत्यारितील विविध अडचणी पालकमंत्र्यांना सांगितल्या. त्यात प्रामुख्याने पाणीपुरवठा, वाहतूक नियंत्रण, कचरा संकलन, रस्ते दुरुस्ती आदींचा समावेश होता. या सर्व समस्या तातडीने दूर करण्याच्या सूचना पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या.

सोसायट्यांना ऊर्जा निर्मितीसाठी सोलार पॅनल बसविणे, सीसीटीव्ही कॅमेरे आणि घनकचरा व्यवस्थापन होण्यासाठी आमदार निधीतून मदत केली जाईल. प्रत्येक सोसायटीतील घरकाम करणाऱ्या महिलांसाठी सॅनिटरी पॅड नॅपकीन आणि सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन बसवून देण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *