Pune Election : भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी उमेदवाराच्या घरी गोंधळ; डॉक्टर महिलेचा विनयभंग, मध्यरात्री तणाव

Pimpri-Chinchwad : पिंपरी- चिंचवड शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पिंपरी प्रभाग क्रमांक २१ मध्ये भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या घरात शिरून धिंगाणा घातल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेत घरातील सदस्यांना शिवीगाळ, मारहाण तसेच ३३ वर्षीय डॉक्टर महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना रात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास घडली.

याप्रकरणी स्वप्नील वाघेरे, सूरज वाघेरे, सागर वाघेरे, सिद्धार्थ वाघेरे, वरुण जगताप, प्रशांत वाघेरे, सारंग वाघेरे यांच्यासह अन्य काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक २१ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या घरात भाजपचे कार्यकर्ते घुसले. तक्रारदार महिलेची जाऊ या प्रभागातून निवडणूक लढवत असून, प्रचार आटोपून तक्रारदार महिला रात्री सुमारे दहा वाजता घरी परतल्या होत्या. आरोपी हे विरोधी पॅनलमधील भाजप उमेदवार उषा संजोग वाघेरे यांचे समर्थक व कार्यकर्ते असल्याचे पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Pune : लोणावळा–खंडाळा घाट टाळून थेट पुण्याला पोहोचणार; 14 किमीचा नवा मार्ग, अर्धा तास वाचणार

तक्रारीनुसार, रात्री १२.१५ च्या सुमारास पिंपरी गावात आरोपी जमले. स्वप्नील वाघेरे याने परवानगीशिवाय घरात प्रवेश करत तक्रारदार महिलेच्या चुलत सासऱ्यांना अश्लील शिवीगाळ केली. “आमच्या विरोधात उमेदवार उभा करण्याचं धाडस केलंस, जीवे मारून टाकू,” अशी धमकी देण्यात आली. आरोपींनी तक्रारदार डॉक्टर महिलेला शिवीगाळ करत अश्लील वर्तन केले आणि तिचा विनयभंग केला. तसेच दिराला धक्काबुक्की, आजीसासूंना ढकलणे, दुचाकी वाहनांचे नुकसान करत परिसरात दहशत निर्माण केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या गंभीर घटनेनंतर राजकीय वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले असून, प्रकरणाचा तपास पिंपरी पोलीस करत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

2 thoughts on “Pune Election : भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी उमेदवाराच्या घरी गोंधळ; डॉक्टर महिलेचा विनयभंग, मध्यरात्री तणाव”

  1. Howdy just wanted to give you a quick heads up. The text in your post seem to be running off the screen in Internet explorer.
    I’m not sure if this is a format issue or something
    to do with browser compatibility but I figured I’d post to
    let you know. The design and style look great though!
    Hope you get the issue fixed soon. Thanks xnxx

    Also visit my page … website (xvideosfap.cc)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *