
Pune : भारताला २०४७ पर्यंत विकसित देश बनविण्यात बँकिंग क्षेत्र अतिशय मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरूवारी येथे व्यक्त केला. आधुनिक तंत्रज्ञानामुळे बँकिंग सेवेचे रूप पालटले असून, ग्राहकांना सुरक्षित आणि सहजपणे डिजिटल बँकिंगचा अनुभव मिळेल, यासाठी शक्य ती सर्व खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.बँक ऑफ महाराष्ट्रचा (महाबँक) ९० वा स्थापना दिवस सीतारामन यांच्या उपस्थितीत बुधवारी साजरा झाला.
यावेळी वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम. नागराजू आणि महाँबकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी निधू सक्सेना उपस्थित होते. सीतारामन म्हणाल्या की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला २०२४ पर्यंत विकसित देश बनविण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. ते गाठण्यात बँकिंग क्षेत्राची भूमिका अतिशय महत्त्वाची असेल. बँकांकडून पायाभूत सुविधा क्षेत्राला गती मिळण्याची गरज आहे. याचबरोबर त्यांनी सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांना (एमएसएमई) निधी उपलब्ध करून द्यायला हवा. बँकिंग क्षेत्राच्या बाहेर असलेल्या वर्गाला या क्षेत्रात समाविष्ट करून घ्यावे लागेल. या माध्यमातून बँका विकसित भारताच्या दिशेने होणारी वाटचाल गतिमान करतील.
|
|
बदलत्या तंत्रज्ञानासोबत बँकिंग क्षेत्राचे रूपही पालटत आहे. ग्राहकांना आता सुरक्षित आणि अतिशय सहज असा डिजिटल बँकिंग अनुभव मिळत आहे. याचवेळी बँकांनाही गाफिल राहता कामा नये. आपली डिजिटल यंत्रणा हॅक होणारी नसावी, याची खबरदारी बँकांनी घ्यावी. कारण बँकिंग व्यवस्थेवर सायबर हल्ला झाल्यास त्यावरील विश्वास डळमळीत होतो. यासाठी भक्कम अशी सायबर सुरक्षा प्रणाली उभी करावी. या प्रणालीची वारंवार चाचणी करून ती आपत्कालीन प्रसंगी कार्य करते का, हे तपासून पाहण्याची जबाबादारीही बँकांवर आहे, असे सीतारामन यांनी नमूद केले.
युनिफाईड पेमेंट इंटरफेसची (यूपीआय) लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. जगातील एकूण डिजिटल व्यवहारांपैकी ४५ टक्के व्यवहार भारतात होतात. सध्या सात देशांत यूपीआयचा वापर सुरू आहे. यामुळे भारतीय बँकांना आंतरराष्ट्रीय व्यवसायाच्या संधी उपलब्ध होत आहेत.
शहर
- मोशी कचरा डेपो दुर्घटना: 'इस्रो' आणि 'एमपीसीबी'चे इशारे धाब्यावर; प्रशासकीय दुर्लक्षामुळे ९ जणांचा बळी
- छत्रपती संभाजीनगर: BAMU आणि एस.बी. हायस्कूल कर्मचाऱ्यांचा आरोप; निवडणूक ड्युटीदरम्यान अधिकारी-पोलिसांकडून दबाव
- तुकाराम मुंढेंची शाळांवर 'वॉच'! विद्यार्थ्यांच्या सुरक्षित अन्नासाठी कँटीन आणि मध्यान्ह भोजनाची कडक तपासणी
- मुंबई: लाडकी बहीण योजनेवर 'कॅग' चा गंभीर ठपका; 3,541 कोटींच्या अतिरिक्त खर्चावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्र
- मोशी कचरा डेपो दुर्घटना: 'इस्रो' आणि 'एमपीसीबी'चे इशारे धाब्यावर; प्रशासकीय दुर्लक्षामुळे ९ जणांचा बळी
- छत्रपती संभाजीनगर: BAMU आणि एस.बी. हायस्कूल कर्मचाऱ्यांचा आरोप; निवडणूक ड्युटीदरम्यान अधिकारी-पोलिसांकडून दबाव
- तुकाराम मुंढेंची शाळांवर 'वॉच'! विद्यार्थ्यांच्या सुरक्षित अन्नासाठी कँटीन आणि मध्यान्ह भोजनाची कडक तपासणी
- वारीच्या भक्तिरंगात रंगली रिंकू राजगुरू; 'बाप विठुराया' गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला एक नवा आणि भावूक अंदाज!
गुन्हा
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट



























Subscribe to my channel




