
Pune : गणेशोत्सवात जिल्हाधिकाऱ्यांनी मद्य भागातील मद्यविक्रीची दुकाने, तसेच मद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्याची मागणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली होती. या आदेशामुळे मध्य भागातील मद्यविक्री दुकाने सलग दहा दिवस बंद राहणार आहेत. अशा प्रकारचा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला असून, या आदेशाचे स्वागत मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. जिल्हाधिकारी सुहास दिवसे आणि पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाचे कार्यकर्त्यांनी कौतुक केले. उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पुढील वर्षी शहर, जिल्ह्यातील मद्यविक्रीची दुकाने दहा दिवस बंद केल्यास खऱ्या अर्थाने पावित्र्य जपले जाईल, अशीही भावना व्यक्त करण्यात आली.
पुण्यातील गणेशोत्सवाला वैभवशाली परंपरा आहे. गणेशोत्सवात देशातील वेगवेगळ्या भागांतून भाविक पुण्यात येतात. भाविकांसह परदेशी पर्यटक उत्सवात आवर्जून हजेरी लावतात. पुण्यातील गणेशोत्सवाचा लौकिक जगभरात पसरला असून, एकदा तरी उत्सव पाहायचा, अशी इच्छा बाळगून अनेकजण पुण्यात येतात. गणेशोत्सवापूर्वी महिनाभर आधी कार्यकर्ते आणि पोलीस तयारीला लागतात. पोलीस मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतात. बैठकांचे आयोजन केले जाते. महिनाभरापूर्वी पोलीस आयुक्तालयात मानाच्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. गणेशोत्सवात मध्य भागातील मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली. पोलीस आयुक्तांनी कार्यकर्त्यांची मागणी विचारात घेऊन याबाबत जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले. मद्यविक्री दुकाने बंद करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी पाठपुरावा केला. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला. उत्सवाच्या कालावधीत मध्य भागातील खडक, फरासखाना, विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मद्यविक्री दुकाने, मद्यालये बंद ठेवण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित प्रस्ताव मान्य करून गणेश विसर्जन मिरवणुकीची सांगता होईपर्यंत मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले.
या आदेशाची कडक अंमलबजावणी सुरू झाली. खडक, विश्रामबाग आणि फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रमुख गणेश मंडळे आहेत. मध्य भागातील मद्यविक्री बंद करण्यात आल्यानंतर इच्छुकांपर्यंत मद्य पोहोचणारच नाही, असे होणार नाही, हेही खरेच. कारण, ज्या भागांत किंवा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मद्यबंदीचे आदेश लागून करण्यात आले आहेत, तेथून काही मिनिटांच्या अंतरावर असलेली मद्यविक्री दुकाने, मद्यालये खुली आहेत. उदाहरण म्हणून पाहिल्यास शनिवार पेठेतील मद्यविक्री दुकान बंद असली, तरी तेथून अवघ्या दाेन ते तीन मिनिटांच्या अंतरावर शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाग येत असल्याने या भागात मद्यबंदी लागू नाही. परिणामी, येथून मद्यविक्री आणि पुरवठा होऊ शकतोच आहे. त्यामुळे मद्यविक्री बंदीची प्रभावी अंमलबजावणी हा मुद्दा राहणार आहेच. त्यासाठीच मद्यबंदी करायची असेल, तर पुढील वर्षी संपूर्ण शहरात करावी, अशी मागणी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
पुण्याच्या गणेशोत्सवावर काहीजण हस्तिदंती मनोऱ्यात बसून टीका करतात. मात्र, उत्सवाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळतो, समाजोपयोगी कामे उभी राहतात, मंडळांच्या माध्यमातून समाजभान येते, उत्तम संघटक, कार्यकर्ता घडतो, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. अर्थात, उत्सवाच्या बदलत्या स्वरूपातील विधायक नसलेल्या अनेक गोष्टी बंद करायला हव्यात, यात कुणाचेही दुमत असणार नाही. पण, काही मंडळे उत्सवातील डामडौल जपून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवित आहेत, त्याचेही कौतुक व्हायला हवे. पुण्यातील अनेक मंडळांचे कार्यकर्ते गणेशोत्सवाकडे फक्त दहा दिवसांचा उत्सव म्हणून पाहत नाहीत. वर्षभर समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात मंडळे अग्रेसर असतात. परिसरातील गरजू नागरिक, विद्यार्थ्यांना मदतही केली जाते. अलीकडच्या काळात तर अनेक मंडळांचे कार्यकर्ते उच्चशिक्षित आहेत. त्यामुळे विधायक कामांबरोबरच उत्सवाचे पावित्र्य जपायला हवे, अशी भावना कार्यकर्त्यांचीही आहे. मद्यविक्रीवर बंदीची मागणी त्यातूनच आली आहे, हे लक्षात घ्यायला हवे. यंदाच्या मद्यविक्रीवरील बंदीआडून काहीजण गैरप्रकार करतील. जादा दराने मद्यविक्री करतील. त्यामुळे गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी फक्त पोलीसच नव्हे, तर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सजग असणे गरजेचे आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




