Praniti Shinde News : भाजपने आपल्या देशाला धर्माची आणि जातीची कीड लावली; प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल

Praniti Shinde News : भाजपच्या विचारसरणीमुळे सोलापूर आज 20 वर्ष मागे गेलाय. तर आपला देश 50 वर्ष मागे गेला आहे. आपल्या देशाला भाजपच्या विचारसरणीने धर्माची आणि जातीची कीड लागली आहे, अशा शब्दांत काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार प्रणिती शिंदेंनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सरू आहे. यामध्ये उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपल्या मतदारसंघात प्रणिती शिंदेंनी सभा घेण्यास सुरूवात केली आहे. सोलापुरात रविवारी रात्री सभा पार पडली. या सभेमध्ये उपस्थितांना संबोधित करताना प्रणिती शिंदेंनी सरकारवर जहरी टीकास्त्र सोडलं आहे.

Sambhajinagar Corporation : छत्रपती संभाजीनगर मनपाची 182 कोटीची विक्रमी कर वसुली

"समोरून उज्वला योजना आणतात आणि मागून पिवळं कार्ड बंद करतात. धान्यच मिळत नसेल तर त्या सिलेंडरवरती काय शिजवायचं?, भाजपच्या कामांचा पाढा वाचत प्रणिती शिंदेंनी असा सवाल उपस्थित केला आहे.

"हाथी के दांत दिखाणे के एक और खाणे के एक" यांच्या विचारसरणीमुळे आपला देश 50 वर्ष मागे गेलाय. आपल्या देशाला भाजपच्या विचारसरणीने धर्माची आणि जातीची कीड लावली आहे. धर्म-जात करून लोकांमध्ये तेढ निर्माण करतायत. आधी आपण असे नव्हतो, निवडणूकीच्या वेळेस आपण सर्वधर्म समभावावर मतदान करायचो. सर्वधर्म समभाव विचारसरणी असणाऱ्या लोकांना धर्मावर मतदान करायला हे प्रवृत्त करत आहेत, असा आरोपही प्रणिती शिंदेंनी भाजपवर केला आहे.

ज्या दिवशी असं व्हायला लागेल त्यादिवशी लोकशाहीला खतरा निर्माण व्हायला लागतो. म्हणून जागे व्हा,ते फक्त गाजर दाखवत आहेत. मी एकमेव आहे जी विधानसभेत भाजप विरोधात बोलते. जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत आम्ही तुमचा आवाज दाबू देणार नाही. मला फक्त एकदा आशीर्वाद द्या,मग बाकी ते टेन्शन माझं, अशा विश्वास प्रणिती शिंदेंनी उपस्थितांसमोर व्यक्त केलाय.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

1 thought on “Praniti Shinde News : भाजपने आपल्या देशाला धर्माची आणि जातीची कीड लावली; प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल”

  1. I’ve been exploring for a little bit for any hugh quality
    artiocles or weblog posts inn this knd of house . Explkring iin Yahoo
    I at last stumbled upon his site. Studyin this
    ihformation So i’m happy to exhibit thaqt I have a very
    goood uncqnny feeling I discovered just whatt I needed.
    I soo mmuch without a douibt will maske certain to
    do not overlook tuis websute and give it a look regularly.
    xnxx

    Here is my web blog: webpagee [https://top.xnxxtubexxx.cc/]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *