Politics : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेश सचिव सोनाली मारणे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आज दुपारी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्या शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश करणार आहेत. पक्षातील अंतर्गत कामकाजावर नाराजी व्यक्त करत त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं.
पश्चिम महाराष्ट्रात एकामागोमाग एक दिग्गज नेते काँग्रेसची साथ सोडत दुसऱ्या पक्षात प्रवेश करीत आहेत. अशातच पुण्यातही काँग्रेसला मोठा खिंडार पडणार असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसच्या फायरब्रँड महिला नेत्या सोनाली मारणे यांनी काँग्रेसला जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत अधिकृतरित्या प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं.
सोनाली मारणे या २०११ पासून काँग्रेसमध्ये सक्रिय कार्यकर्त्या म्हणून कार्यरत होत्या. पुण्यात काँग्रेस पक्षाच्या उभारणीसाठी आणि पक्ष अधिक बळकट करण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे. दरम्यान, पक्षात कार्य करत असताना त्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी आता राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
|
सोनाली यांनी स्पष्ट केलं की, 'ज्याप्रमाणे विरोधी पक्ष म्हणून पक्षाने काम करायला हवे तसे पक्षात काम होत नाही, याची खंत आहे. जे काँग्रेस पक्षात योग्य काम करतात त्यांना न्याय दिला जात नाही. निवडणूक आकडेवारीपेक्षा कार्यकर्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करणं हे पक्षाचं अपयश आहे', असं त्यांनी राजीनाम्यापत्रात नमूद केलं.
राजीनामा देत त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याचं स्पष्ट केलं. आज दुपारी मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश होत असल्यामुळे पुण्यात शिंदे गट अधिक बळकट होणार असल्याचं बोललं जात आहे.
शहर
- Mumbai Rain : पावसामुळे मुंबईत मातीचा ढिगारा घसरला, ५ जण मलब्याखाली अडकले, एकाचा मृत्यू
- Pune Bridge Incident : पुण्यात जोरदार पाऊस, कुंडमळानंतर आणखी एक पूल वाहून गेला; परिसरात मोठी खळबळ
- Pune Rain : पुण्यात पावसाचा कहर! रस्ते जलमय, शेवटी जेसीबीनेच काढावे लागले साचलेले पाणी; नागरिकांचा संताप
- Navi Mumbai Crime : १२ हजार पगार, वाजवी पगारात खर्च भागेना; नवी मुंबईतल्या तरुणीच्या आत्महत्येचं कारण समोर
महाराष्ट्र
- MHADA : पुण्यात म्हाडाची बंपर लॉटरी! ५२ फ्लॅट अन् २८ ऑफिससाठी नोंदणी सुरु, अर्ज मागवले
- Shocking Crime : '२ हजार द्या डेडबॉडी गुंडाळतो'; मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारा लाचखोर सीसीटीव्हीत कैद
- Sambhajinagar : मुलीची भेट ठरली शेवटची; माघारी परतताना काळाची झडप, नाल्यातून बैलगाडी नेताना शेतकऱ्यासह बैल बुडाला
- Zilha Parishad School : पंचायत समितीच्या दारातच भरली शाळा; काय आहे कारण?, तांबेवाडी शाळा व्यवस्थापन समितीचे अनोखे आंदोलन
गुन्हा
- Pune Crime : पुण्यातील कोंढव्यात मजूर म्हणून काम, पोलिसांना कुणकुण; धाड टाकून ४ बांगलादेशींना शहरातून अटक
- Pune Crime : पुण्यात चाललंय काय? गाडीला कट लागल्याच्या रागातून राडा, बिबवेवाडीत मध्यरात्री गोळीबाराचा थरार
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद- लंडन एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, मोठी दुर्घटना टळली
- Air India : दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, पायलटने हवेतच...
- Kedarnath : केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळून भीषण अपघात, गुप्तकाशीसाठी निघालेल्या सहा भाविकांसह पायलटचा मृत्यू
- Air India Plane Crash : चहाच्या टपरीवर झोपला होता, विमान कोसळताच भडका; मुलाला जळताना पाहून आईनं घेतली धाव; पण शेवटी..