
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आधीच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातील अनुसूचित जाती- अनुसूचित जमातीच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाच्या योजनांना स्थगिती दिली आहे. या स्थगितीमुळे सामाजिक न्याय विभागाचीच जवळपास १२०० कोटी रुपयांची विकासकामे ठप्प होणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
शिंदे-फडणवीस सरकारच्या ‘स्थगिती धोरणा’चा परिणाम प्रामुख्याने दलित वस्ती सुधार योजना, औद्योगिक सहकारी संस्थांचे अनुदान, अपंग आणि आदिवासी आश्रमशाळांचे बांधकाम आदींवर होणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारने काही आदेश काढून जिल्हा वार्षिक योजनेचा निधी तसेच, सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागांच्या विकासकामांना आणि मंजूर निधी वितरणास स्थगिती दिली. मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या सरकारने काढलेल्या स्थगिती आदेशामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित वस्ती सुधार योजना, अनुसूचित जातीसाठींच्या औद्योगिक सहकारी संस्थांना देण्यात येणारे भागभांडवल, कर्ज, अपंग शाळांचे अनुदान आणि इतर विकासकामे ठप्प होणार आहेत. या स्थगितीमुळे सामाजिक न्याय विभागाच्या विविध प्रकारच्या सुमारे १२०० कोटी रुपयांच्या विकास योजनांवर परिणाम होणार आहे.
गेल्या शुक्रवारी काढलेल्या एका आदेशान्वये अनुसूचित जातींच्या १३ औद्योगिक वसाहतींना देण्यात आलेल्या मंजुरीला स्थगिती देण्यात आली आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत मंजूर कामांनाही स्थगिती देण्यात आली आहे. अनुसूचित जातीप्रमाणेच, अनुसूचित जमातीच्या विकासकामांनाही स्थगिती देण्यात आली आहे. त्यात शासकीय आश्रमशाळा, शासकीय वसतिगृहे, कार्यालयीन इमारती, यांच्या बांधकामांचा समावेश आहे. वास्तविक पाहता नवीन सरकार स्थापन झाल्याच्या तारखेपासून म्हणजे ३० जूनपासून स्थगिती दिली असती तरी काही हरकत नव्हती. परंतु त्या आधीपासून म्हणजे १ एप्रिलपासून स्थगिती दिल्यामुळे काही कामे सुरू असल्याने ती अर्धवट सोडावी लागतील, याकडे मंत्रालयातील अधिकाऱ्याने लक्ष वेधले. स्थगिती उठविल्यानंतर पुन्हा निविदा, कंत्राटे ही प्रक्रिया पुन्हा पार पाडावी लागेल. त्यासाठी आणखी वेळ द्यावा लागणार आहे. त्याचा परिणाम दलित, आदिवासी समाजाच्या विविध विकास योजनांवर होणार असल्याचे या अधिकाऱ्याने निदर्शनास आणले.
होणार काय? अनुसूचित जाती आणि जमातींच्या विकासकामांना आणि मंजूर निधी वितरणास स्थगिती दिल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित वस्ती सुधार योजना, औद्योगिक सहकारी संस्थांचे भागभांडवल, कर्ज, अपंग शाळांचे अनुदान, शासकीय आश्रमशाळा, शासकीय वसतिगृहे, कार्यालयीन इमारतींचे बांधकाम आदी १२०० कोटींच्या कामांना खीळ बसणार आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




