
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिला सामना नागपुरात पार पडला. शनिवारी पार पडलेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर एक डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाने पहिल्या डावाच्या जोरावर २२३ धावांची आघाडी घेतली होती. परंतु दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ ३२.२ षटकात ९१ धावांवर आटोपला. भारताकडून आर आश्विनने सर्वाधिक ८ विकेट्स घेत आस्ट्रेलिया संघाला खिंडार पाडली. भारतीय संघाने आता चार सामन्यांच्या मालिकेत १- ० अशी आघाडी घेतली आहे.
पहिल्या डावात ४०० धावा केल्यानंतर टीम इंडियाला २२३ धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात सातत्याने विकेट गमावल्या. परिणामी तिसऱ्या दिवशीच संघाला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावांचे योगदान दिले. त्याने ५१ चेंडूत २ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद २५ धावा केल्या. त्याचबरोबर भारताकडून आर आश्विनने सर्वाधिक ५ विकेट्स घेत भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय ऑस्ट्रेलिया संघाला महागात पडला. त्याचा सर्व संघ ६३.५ षटकांत १७७ गुंडाळला. ऑस्ट्रेलिया संघाकडून मार्नस लाबुशेनने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. त्याने ४९ धावा केल्या. अशा पद्धतीने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघातील एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नाही. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना रवींद्र जडेजाने सर्वाधिक पाच विकेट्स घेत ऑस्ट्रेलिया संघाला सुरुंग लावण्याचे काम केले.
भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद ४०० धावा केल्या होत्या. भारतीय संघाकडून रोहित शर्माने सर्वाधिक धावा केल्या. त्याने २१२ चेंडूचा सामना करताना, १५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १२० धावांचे योगदान दिले. तसेच रवींद्र जडेजा ( ७०) आणि अक्षर पटेल (८४) धावा केल्या. ऑस्ट्रेलिया संघाकडून गोलंदाजी करताना टॉड मर्फीने सर्वाधिक ७ विकेट्स घेतल्या. याबरोबर त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये रोहित शर्मा पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करत आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना १७ फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
शहर
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
- दौंडमध्ये हॉटेल ओएसिसमध्ये राडा! सहजापूर फाट्यावर तुफान हाणामारी; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद
महाराष्ट्र
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- सांगलीत काळाचा घाला! जत तालुक्यात भिंत कोसळून ६ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू; मुसळधार पावसाने घातला धुमाकूळ
- मुंब्र्यात खळबळ! ठाणे महापालिकेच्या महिला डॉक्टरची सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
गुन्हा
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
राजकीय
- राजकारणात असूनही चिमुरड्यांना न्याय देता येत नसेल, तर आपण फसलो आहोत; आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका
- भाजपला देशभर आग लावून निवडणुका जिंकायच्या आहेत; खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
- सुनेत्रा पवारांची 'दिल्ली वारी'; राज्यसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा? बारामती विजयानंतर सक्रिय राजकारणात मोठ्या निर्णयाची शक्यता
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
इतर
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
मनोरंजन
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
- प्रभासच्या 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर शोककळा; भीषण अपघातात क्रू मेंबरचा मृत्यू, शूटिंग तात्पुरते स्थगित!
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
देश विदेश
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!
- हंताव्हायरसचा धोका! क्रूझवरील ३ जणांच्या मृत्यूनंतर भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; आता पुढे काय?
- वय ७४ वर्षे आणि ७२ देशांची एकट्याने सफर! ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा जगप्रवासाचा प्रेरणादायी थरार
- अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा! 'होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, अन्यथा बॉम्बहल्ल्यांना तयार राहा'; ट्रम्प यांची थेट धमकी!






















Subscribe to my channel




