
PM Kisan Samman Nidhi 13th Installment : देशभरातील लाखो शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या १३ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पीएम किसानचा १३ वा हप्ता कधी मिळणार? याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे. अशातच, शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने पीएम किसान योजनेच्या १३ व्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे.
केंद्र सरकारच्या किसान सन्मान निधी (PM Kisan)अंतर्गत शेतकऱ्यांना एकूण ६००० रुपये वार्षिक मिळतात. केंद्र सरकार ते पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन टप्प्यांत वर्ग करणार आहे. म्हणजेच वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये पैसे पाठवले जातात. शेतकऱ्यांना प्रत्येक हप्त्यात २००० हजार रुपये मिळतात.
या योजनेअंतर्गत आतापर्यंत १२ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता १३ व्या हप्त्याची शेतकरी आतुरतने वाट पाहत आहे. अशातच, १३ वा हप्ता कधी मिळणार याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारकडून १३ व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
पीएम किसानचा १३ वा हप्ता कधी मिळणार?
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा तेरावा हप्ता या महिन्यात बळीराजाच्या खात्यात जमा होणार आहे. योजनेअंतर्गत तेरावा हप्ता २७ फेब्रुवारी रोजी खात्यात जमा होणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. या योजनेचा लाभ केवळ आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होईल.
पीएम किसान योजना काय आहे?
पीएम किसान योजना ही एक केंद्रीय योजना आहे, जी देशातील सर्व भूमीधारक शेतकऱ्यांना कृषी आणि संबंधित कामासाठी तसेच घरगुती आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्य करते. शेतकर्यांना सन्माननीय जीवनासाठी मदत म्हणून ही योजना सुरु झाली. या योजनेच्या लाभार्थ्यांचे संपूर्ण आर्थिक दायित्व केंद्र सरकार उचलते.
खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही हे कसे पाहायचे?
-
प्रधानमंत्री किशन सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाइटवर जा - pmkisan.gov.in.
-
वेबसाईटच्या उजव्या बाजूला 'फार्मर्स कॉर्नर' आहे. खाली 'लाभार्थी स्थिती' टॅब आहे. त्यावर क्लिक करा.
-
नंतर 'मोबाइल नंबर' निवडा. 'नोंदणी क्रमांक' वर क्लिक करा. मग कॅप्टा द्यावा लागेल. त्यानंतर 'डेटा मिळवा' वर क्लिक करा.
-
पंतप्रधान सन्मान निधीचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले आहेत की नाही हे तुम्ही पाहू शकाल.
या शेतकऱ्यांना मिळणार नाही PM किसानचा लाभ
पीएम किसान लाभार्थी शेतकऱ्यांना ई केवायसी करणे बंधनकारक आहेत. अशातच ज्या शेतकऱ्यांनी अद्याप त्यांचे EKYC पूर्ण केले नाही त्यांना तेराव्या हप्त्याची रक्कम मिळणार नाही. OTP आधारित eKYC PM Kisan पोर्टलवर उपलब्ध आहे. बायोमेट्रिक आधारित eKYC साठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधता येईल. eKYC ची अंतिम तारीख १० फेब्रुवारी होती.
शहर
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
- दौंडमध्ये हॉटेल ओएसिसमध्ये राडा! सहजापूर फाट्यावर तुफान हाणामारी; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद
महाराष्ट्र
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- सांगलीत काळाचा घाला! जत तालुक्यात भिंत कोसळून ६ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू; मुसळधार पावसाने घातला धुमाकूळ
- मुंब्र्यात खळबळ! ठाणे महापालिकेच्या महिला डॉक्टरची सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
गुन्हा
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
राजकीय
- राजकारणात असूनही चिमुरड्यांना न्याय देता येत नसेल, तर आपण फसलो आहोत; आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका
- भाजपला देशभर आग लावून निवडणुका जिंकायच्या आहेत; खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
- सुनेत्रा पवारांची 'दिल्ली वारी'; राज्यसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा? बारामती विजयानंतर सक्रिय राजकारणात मोठ्या निर्णयाची शक्यता
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
इतर
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
मनोरंजन
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
- प्रभासच्या 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर शोककळा; भीषण अपघातात क्रू मेंबरचा मृत्यू, शूटिंग तात्पुरते स्थगित!
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
विडियो गॅलेरी

देश विदेश
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!
- हंताव्हायरसचा धोका! क्रूझवरील ३ जणांच्या मृत्यूनंतर भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; आता पुढे काय?
- वय ७४ वर्षे आणि ७२ देशांची एकट्याने सफर! ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा जगप्रवासाचा प्रेरणादायी थरार
- अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा! 'होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, अन्यथा बॉम्बहल्ल्यांना तयार राहा'; ट्रम्प यांची थेट धमकी!






















Subscribe to my channel




