
पुणे - संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या शहरात एकत्र आल्यानंतर त्या मार्गावरील वाहतूक सोमवारी (ता. १२) दुपारी १२ वाजल्यापासून आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पालखी मार्गावरील दोन्ही बाजूस शंभर मीटरपर्यंत वाहने उभी करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
अरुणा चौक ते पारशी अग्यारी आणि पालखी विठोबा चौक ते बाबासाहेब किराड पथ जंक्शन या मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना ये-जा करण्यास व पार्किंग करण्यास बंदी राहील, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.
पालख्यांचे एकत्रित मार्ग -
पुणे- मुंबई रस्त्याने इंजिनिअरिंग कॉलेज चौक, संचेती चौक, सिमला ऑफीस चौक, वीर चाफेकर चौक, ज्ञानेश्वर पादुका चौक, तुकाराम पादुका चौक, गुडलक चौक, खंडुजी बाबा चौक, टिळक चौक, लक्ष्मी रस्त्याने विजय टॉकीज चौक, सेवासदन चौक, बेलबाग चौक, बुधवार चौक, पासोड्या विठोबा मंदिर, मोती चौक, सोन्या मारुती चौक, हमजेखान चौक, डुल्या मारुती चौक, नानापेठ पोलिस चौकी येथे आल्यानंतर संत तुकाराम महाराजाची पालखी अरुणा चौकमार्गे निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्काम करेल. तसेच, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी अशोक चौकमार्गे पालखी विठोबा मंदिरात मुक्काम करेल.
वाहतुकीसाठी बंद रस्ते (कंसात पर्यायी मार्ग)
-
गणेश खिंड रस्ता- रेंजहिल चौक ते संचेती चौक (रेंज हिल्स- खडकी पोलिस ठाणे अंडरपास- पोल्ट्री चौक- जुना मुंबई-पुणे महामार्ग किंवा रेंज हिल्स- सेनापती बापट रस्ता- नळ स्टॉप चौक)
-
फर्ग्युसन रस्ता- खंडुजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक (खंडोजीबाबा चौक- कर्वे रस्ता- सेनापती बापट रस्ता)
-
शिवाजी रस्ता- गाडगीळ पुतळा ते स. गो. बर्वे मार्ग (गाडगीळ पुतळा - कुंभार वेस चौक-आरटीओ चौक)
-
वीर चापेकर चौक ते वाकडेवाडी भुयारी मार्ग (पोल्ट्री फार्म चौक, रेंजहिल मार्ग किंवा औंध मार्ग)
-
मॉडर्न कॉलेज रस्ता- डेक्कन वाहतूक विभाग ते थोपटे पथ चौक (घोले रोड व आपटे रोड)
-
कुंभार वेस चौक ते गाडगीळ पुतळा चौक आणि मालधक्का ते शाहीर अमर शेख चौक (कुंभार वेस- पवळे चौक- फडके हौद चौक किंवा मालधक्का चौक- नरपतगीर चौक- १५ ऑगस्ट चौक - कमला नेहरू रुग्णालय)
दिंड्यांसोबत येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग
पालख्यांसह १२ जून रोजी आळंदीकडून विश्रांतवाडीपर्यंत येणाऱ्या वाहनांनी आळंदी- मरकळ - तुळापूर - फुलगाव - लोणीकंद - वाघोली- लोहगाव- येरवडा या मार्गाचा वापर करावा. इंदिरानगर, दत्तमंदिरपासून मरिआई गेटकडे जाणाऱ्या वाहनांनी साप्रस चौकी जंक्शन-चंद्रमा चौक-सादलबाबा दर्गा- पर्णकुटी चौक या मार्गाचा वापर करावा.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




