छत्रपती संभाजीनगर: उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांनाही सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, या मागणीसाठी राज्यातील सुमारे ३४ हजार न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आज, मंगळवारपासून (दि. १७) बेमुदत संप पुकारला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव उच्च न्यायालयाने शासनाकडे पाठवूनही त्यावर निर्णय झालेला नाही. वारंवार पाठपुरावा करूनही शासन दखल घेत नसल्याने आता संपाचा निर्णय घेण्यात आल्याचे कर्मचारी संघटनांनी स्पष्ट केले. शासन निर्णय जारी झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
सुधारित वेतनश्रेणी लागू करा
उच्च न्यायालय आणि दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन २००६ पर्यंत समान होते. मात्र, २०२३ मध्ये उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांसाठी सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालय तसेच नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठातील कर्मचाऱ्यांना या वेतनवाढीचा लाभ दिला. त्याच धर्तीवर दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांनाही सुधारित वेतनश्रेणी लागू होणे अपेक्षित होते. मात्र, शासनाने याबाबत निर्णय घेतला नसल्याने दोन्ही संवर्गांमध्ये वेतनाची तफावत निर्माण झाली आहे.
दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीसंदर्भात उच्च न्यायालयाने न्यायमूर्तीची समिती गठित केली होती. या समितीच्या शिफारशीनुसार ३१ जानेवारी २०२५ रोजी सुधारित वेतनश्रेणीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला. मात्र, अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघ गट-क, लघुलेखक, बेलीफ, वाहनचालक आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनांनी एकत्रितपणे संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
'आधी जीआर, मगच माघार'
औरंगाबाद जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार दांडगे, सचिव मोहम्मद रियाजोद्दीन गाझी, मार्गदर्शक बाळासाहेब चव्हाण यांच्यासह विविध कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी 'आधी जीआर, मगच माघार' अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
निवृत्त कर्मचारीही आंदोलनात
राज्यातील सुमारे पाच हजार सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचारीही या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येणार आहे.
शहर
- मुंबई: बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती दालनाचं उद्घाटन कोण करणार? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितले, सत्ताधाऱ्यांना लगावला टोला
- मुंबई: लोकलमध्ये धक्कादायक थरार! दोन प्रवाशांच्या भांडणात फेकलेला चाकू घुसला तिसऱ्याच निष्पाप प्रवाशाच्या छातीत; अंधेरीतील घटना
- पुणे: पुण्यात खोटा आयएएस अधिकारी असल्याचा बनाव; २१ वर्षीय तरुणाने उच्चभ्रू सोसायटीला गंडवले ३५ लाख
- मुंबई: हुतात्मा दिनी राज्यातील रेल्वे स्थानकांवर वाजवा महाराष्ट्र गीत; मराठी अभ्यास केंद्राचे मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनाला निवेदन
महाराष्ट्र
- मुंबई: बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती दालनाचं उद्घाटन कोण करणार? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितले, सत्ताधाऱ्यांना लगावला टोला
- सातारा: फलटणमधील दुर्देवी घटना; फटाक्यांच्या पिशवीत ठिणगी पडल्याने गंभीर भाजलेल्या दीड वर्षाच्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू"
- मुंबई: लोकलमध्ये धक्कादायक थरार! दोन प्रवाशांच्या भांडणात फेकलेला चाकू घुसला तिसऱ्याच निष्पाप प्रवाशाच्या छातीत; अंधेरीतील घटना
- पुणे: पुण्यात खोटा आयएएस अधिकारी असल्याचा बनाव; २१ वर्षीय तरुणाने उच्चभ्रू सोसायटीला गंडवले ३५ लाख
गुन्हा
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लोकहिताचे काम करत राहणार आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची गोवा येथे गर्जना
- नवी दिल्ली: पाठिंब्याबाबत शरद पवार गटाच्या संकेतांमुळे NDAला मिळाले बळ; संसदेत १० ते १५ मते अधिक मिळण्याची शक्यता
- कर्नाटक: सौंदत्ती रेणुका देवीच्या दर्शनाला निघालेल्या पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघे जागीच ठार!
- गोवा: महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविण्यावर सरकारचा विशेष भर; आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन


























Subscribe to my channel



