
Nashik : नाशिक जिल्ह्यातील आंबेगन शिवारात राष्ट्रीय महामार्गावर दोन वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, या अपघातात सहा ते सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. नाशिकहून पेठच्या दिशेने जाणारी कार आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुसऱ्या कारमध्ये ही धडक झाली. अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला. मृत प्रवाशांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहेत.
जखमींवर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी चार महिलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देखील समोर येत आहे. शिर्डी येथे दर्शन घेऊन नाशिकमार्गे गुजरातमधील वापीकडे जात असताना चाचडगाव टोलनाका ओलांडल्यानंतर हा अपघात झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
|
Pune : सोशल मीडियातून जाळं, अमनची निर्घृण हत्या; मोबाईल ‘दृश्यम’ पॅटर्नने ट्रकमध्ये फेकल्याचा खुलासा |
दोन दिवसांपूर्वीच असाच भीषण अपघात
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच असाच एक भीषण अपघात झाला होता. राहुरी ते शनिशिंगणापूर रस्त्यावर उंबेरे (ता. राहुरी) गावाजवळ रिक्षा व मिनीबस यांची समोरासमोर धडक होऊन यात इगतपुरीजवळील गिरणारे येथील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. दुसऱ्या एका घटनेत सटाण्याजवळ ढोलबारे गावाजवळ नवापूर तालुक्यातील आमलीपाडा येथील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला.
इगतपुरीजवळील गिरणारे येथील काही तरुण पालखी घेऊन शिर्डीला गेले होते. त्यातील काही तरुण रिक्षाने (क्र. एमएच 15, एजे 1133) शनिशिंगणापूरला दर्शनासाठी निघाले होते. राहुरीजवळ समोरून येणाऱ्या मिनी बसने (क्र. एमएच 04, एलक्यू 7254) समोरासमोर धडक दिली. यात रिक्षाचा चक्काचूर झाला, मिनीबस तर रस्त्याच्या खाली जाऊन उलटली.
या भीषण अपघातात रिक्षातील दीपक जगन डावखर (वय 22), आकाश मनोहर डावखर (वय 22) व दीपक विजय जाधव (वय 22, सर्व रा. गिरणारे ता. इगतपुरी, जि. नाशिक). हे जागीच ठार झाले. तर, रुपेश गणेश भगत (वय 19) व रोशन गंगाधर डावखर (सर्व रा. गिरणारे) हे गंभीर जखमी झाले.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!

























Subscribe to my channel



1 thought on “Nashik : शिर्डी दर्शनानंतर परतताना भीषण अपघात, दोन कारंचा जबर धडक; चौघांचा जागीच मृत्यू”