
Pune : चार वर्षांपूर्वी महापालिकेत समाविष्ट झालेल्या निम्म्यापेक्षा अधिक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करून काहींची पदोन्नतीही करण्यात आली आहे. पालिका प्रशासनाकडून राबविण्यात आलेले हे धोरण अत्यंत अन्यायकारक असल्याची तक्रार या कामगारांनी केली असून आयुक्त कार्यालयाकडे त्याबाबत दाद मागितली आहे. याबाबत आयुक्तांनी पुन्हा पडताळणीचे आदेश देवून अहवाल मागविला आहे. चार वर्षांपूर्वी तेवीस गावांच्या समावेशाबरोबर तेथील कर्मचाऱ्यांचाही पालिका प्रशासनात समावेश झाला आहे. जिल्हापरिषदेच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून हा अहवाल महापालिकेकडे सुपूर्द केला होता.
त्यानुसार पालिकेनेही या कर्मचाऱ्यांचा पूर्वापार म्हणून समावेश केला आहे. पालिका आस्थापना विभागाने सेवकांच्या नेमणुका व वेतन निश्चिती बाबतची पूर्ण माहिती तपासणी केली. तपासणी करुन पूर्ण अहवाल तयार करण्यात आला. दोन वर्षाच्या कालावधीनंतर सन १९९७, सन २०११ व २०१७ मध्ये समावेश झालेल्या गावांप्रमाणे सन २०२१ मध्ये समावेश झालेल्या सर्व सेवकांचे समावेशन व वेतननिश्चीती करुन आयुक्तांच्या मान्यतेने ४०८ व ३७ सेवकांची समावेशन व वेतन निश्चिती केलेली होती. सदर वेतन निश्चिती मनपा धोरणानुसार लेखापरीक्षण करून व पूर्ण तपासणी करण्यात आलेली होती. त्यानुसार ३० जून २०२१ पासून वेतन देण्यात आले असून त्यानुसार काही कर्मचाऱ्यांना फरकही देण्यात आला आहे. २०२४ ला वेतनामधून प्राप्तीकरही कपात करण्यात आला आहे.
|
|
परंतु, पालिकेतील काही सेवक व संघटनांच्या दबावाखाली येत अतिरिक्त आयुक्तांनी समाविष्ट २३ गावांमधील सेवकांची समावेशन व वेतन निश्चिती तपासणीसाठी समिती नेमली. या समितीने जाणूनबुजून व सूड भावनेने चुकीचा अहवाल सादर केला आहे. त्यामुळे समाविष्ट कर्मचाऱ्यांचे वेतन व आस्थापने (हुद्दा) बाबत अन्यायकारक बदल झाले आहेत. त्यामध्ये अनेक कामगारांचे वेतन कमी करून पदावनतीही करण्यात आली आहे. ही बाब अन्यायकारक असल्याची तक्रार गणेश झांबरे, सिद्धार्थ भोसले, सुरेश आदमाने, अलोक कुंभार, रामदास भंडारी, सोनाली टिळेकर, मेघा हिंघे, रूपाली माने, दीपाली चव्हाण, कोमल दारवाटकर, शीतल शेवाळे, श्रद्धा भोसले, अमित निंबाळकर, गणेश हांडे, गणपत शेंडकर, जनार्धन एडके, प्रसाद सोनवणे, अनिल काळभोर, सचिन कटरे, सागर हगवणे, अनिल घुले, भाऊसाहेब जाधव आदी कर्मचाऱ्यांनी केली आहे. दरम्यान, या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार माजी सरपंच शिवराज घुले, माजी उपसरपंच राहुल शेवाळे, संदीप लोणकर, पालिकेतील शासन नियुक्त समिती सदस्य अजित घुले, अमर घुले, बाळासाहेब घुले, मयूर खलसे यांनी आयुक्तांची भेट घेवून वेतन समितीच्या अहवालावर पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.
कर्मचारी धास्तावला
वेतन समितीने दिलेल्या अहवालामुळे हे कर्मचारी भयभीत होवून धास्तावले आहेत. मूळ पगारातच दहा-बारा हजाराने कपात झाल्याने त्यांचे कौटुंबिक खर्चाचे नियोजन ढासळणार आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी मुलामुलींचे शिक्षण, लग्न, औषधोपचार, ऑपरेशन, घर बांधणीसाठी लाखो रुपयांची कर्जे घेतली आहेत. वेतन कपात, कर्जाचे हप्ते आणि खर्चाचा मेळ कसा साधावा, असा प्रश्न या कामगारांसमोर निर्माण झाला आहे.
"एकाच दिवशी ग्रामपंचायतमध्ये कामाला लागलेले काही कामगार आहेत. त्यांना समान वेतन होते. आता त्यांचे वेतन कमीजास्त आहे. एकाच हुद्द्यावर काम करणाऱ्या कामगारांपैकी काहिंची पदावनती केली आहे. काहिंच्या वेतनामध्ये वाढ, काहींचे आहे तेच तर मोठ्या संख्येतील कामगारांचे वेतन कपात करण्यात आले आहे. हा विरोधाभास स्पष्टपणे दिसून येत असल्याने त्याबाबत पुन्हा तपासणी करून या कामगारांना आयुक्तांनी न्याय द्यावा.'
राहुल शेवाळे - माजी उपसरपंच, शेवाळेवाडी
"गावे पालिकेत समाविष्ट झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत जे वेतन देत होती ते दिले जात होते. महापालिका आणि ग्रामपंचायतची वेतनश्रेणी वेगवेगळी आहे. पडताळणी समितीच्या अहवालानुसार समाविष्ट ४४५ कर्मचाऱ्यांपैकी पात्रतेनुसार निम्म्यापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचे वेतन कमी होत आहे. काही कर्मचाऱ्यांचे वेतन तेच तर काहींच्या वेतनात वाढ होत आहे. या बाबींवर कर्मचाऱ्यांनी हरकत घेतली असून आयुक्तांनी त्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली आहे. दोन्हीही बाजू तपासून आयुक्तांकडून त्यावर निर्णय घेतला जाईल.'
प्रसाद काटकर - विशेष कार्यकारी अधिकारी, पालिका आयुक्त
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




