मुंबई: मॅनहोल दुर्घटना: पालिका आयुक्तांकडून ४ अधिकारी निलंबित, निष्काळजी कंत्राटदारावरही होणार कारवाई!

मुंबई: साकीनाका परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षीय अस्लम एसाफ शेख यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेची महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी निष्काळजीपणा केल्याबद्दल पालिकेच्या चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून कंत्राटदारावरही गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

निलंबित अधिकारी: एल विभागाचे सहायक आयुक्त धनाजी हरळेकर, सहायक/दुय्यम अभियंता दीपक चौगुले, कनिष्ठ अभियंता अभिजित चौगुले आणि सहायक अभियंता (मलनिस्सारण) उत्तम पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.

कंत्राटदारावर कारवाई: मॅनहोलवर जाळी बसवण्याचे काम सुरू असताना सुरक्षेच्या नियमांचे पालन न केल्याबद्दल संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात आले असून त्याच्यावर गुन्हाही दाखल केला जाणार आहे.

 

उच्चस्तरीय चौकशी: या प्रकरणाची व्याप्ती पाहता अतिरिक्त महापालिका आयुक्तांच्या (पश्चिम उपनगरे) अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली असून, सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रतिबंधात्मक उपाय: या घटनेनंतर आयुक्तांनी सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांना मॅनहोलच्या चारही बाजूंनी बॅरिकेड्स लावण्याचे आणि पुढील आठ दिवसांत संपूर्ण क्षेत्रातील मॅनहोलची १०० टक्के तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. मृत व्यक्तीच्या कुटुंबाला महापालिकेच्या वतीने १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर करण्यात आले आहे.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *